रविवार, 8 सितंबर 2013

जिभेवरील अनियंत्रणाचा फटका --भाग 15

जिभेवरील अनियंत्रणाचा फटका -- भाग 15

जिभेबद्दल खूप व्यक्तींनी इतरांचे खूप प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हीच्यावर नियंत्रण ठेवणे कीती महत्वाचे आहे हे सांगीतले आहे. जिभेवर दोन प्रकारे नियंत्रण ठेवावे लोगते. एक बोलण्याच्या संदर्भात आणि दुसरे खाण्याच्या संदर्भात या दोन्ही क्रियांचा पण अन्योन्य संबंध आहे. एका प्रकारचे नियंत्रण जमते. दुसर्याही प्रकारचे जमू शकते. आपण पुष्कऴदा आग्रह झाल्यामुऴे, एखादा आवडीचा पदार्थ समोर आल्यामुऴे किंवा पानात घेतलं आहे ते संपवाव यामुऴे तर कधी  गप्पांच्या नादात जास्त जेवण करतो. त्याचा जर आपल्याला त्रास झाला तर तो आपल्याच अधाशीपणामुऴे झाला हे कबूल करण्याची आपली मनाची तयारी नसते. म्हणूनच याबाबतचा माझा अनूभव मुद्दाम सर्वांसमोर ठेवत आहे.
     चाऴीशीनंतर निसमीत व्यायाम न केल्यास आपली अन्नपचनाची शक्ती कमी होऊ लागते. अशा वेऴी हा अनुभव आला की दाणे कोणत्याही स्वरूपात खाल्ले तरी ते प्रमाणाबाहेर खाल्ले गेले तर त्याचा त्रास होतोच व पित्त बाहेर पडून गेल्याशिवाय हा त्रास थांबत नाही. पोटात हमखास वाताचा प्रकोप म्हणजे गॅस धरणे हा प्रकार होतो. या वाताला आयुर्वेदाला अपानवायु असे नाव आहे व तो अधोगामि म्हणजे खालच्या दिशेने निघून जाणारा असतो. परंतू वाताचा प्रकोप झाल्यास तो कफ व पित्त या दोघांवरही विपरीत परीणाम करू शकतो. अपानवायुचा प्रकोप झाल्यास तो उर्ध्वगामी होतो. अशावेऴी करपट ढेकर मोठ्या प्रमाणावर येण्यास सुरूवात होते. त्या पुढची पायरी म्हणजे आम्लपित्ताचा त्रास सुरू होतो. यापुढची पायरी म्हणजे श्वासोच्छवासाचा त्रास त्यानंतर ह्रदयाच्या मांसपेशींमधे दुखणे व सरते शेवटी पाठीच्या मणक्याचा त्रास इथपर्यंत एका उर्ध्वगामी अपानवायुमुऴे दुश्परीणाम होतात.

      मला अधून मधून शेंगदाणे खाण्याची तीव्र इच्छा होते. शेंगदाणे पाण्यात भिजवणे, भाजणे, मिठासोबत खाणे व गुऴासोबत खाणे याचे फायदे वेगवेगऴे असतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे मात्र मला असाच एक दिवस जास्त दाणे खाल्याचा जबरदस्त त्रास झाला. मोठ्या प्रमाणावर खाल्लेले दाणे पचायला वेऴ लागत असल्याने सुमारे दहा तास पोटदुखीने हैराण केले. तीन ते चार वेऴा उलटी होऊन बरेचसे अन्न बाहेर पडून गेल्यावर मग कुठे बरे वाटले. त्यानंतर असाच प्रकार पुन्हा चार पाच वेऴ घडला. निमीत्ताला कधी शेंगदाणे, कधी पुलाव , कधी तिखट चटपटीत इडली सांबर असे होते.प्रत्येक वेऴी घरची मंडऴी किंवा तात्काऴ उपलब्ध झालेले डॉक्टर उपाय सुचवतांना आधी काय खाल्ले यापेक्षा किती खाल्ले ते या समस्येचे मूऴ आहे. अशा वेऴी फार घाईने उलट्या काढणे त्रासाचे ठरले कारण चक्कर येऊ लागली. सोडा इत्यादी घेणे त्रासाचे ठरले कारण ज्यादा गॅस निर्माण झाल्याने पोटाला जास्त तडस लागून पोटाच्या जोडीला छाती व पाठही दुखू लागते. जे कमी त्रासाचं ठरलं ते थंडगार पाणी घोट दोन घोट पीत रहावे. उलटी येत असेल तेव्हा तोंडात जी लाऴ किंवा थुंकी निर्माण होते ती पटापट गिऴत राहील्यास उलटी थांबण्याची प्रव्रुत्ती निर्माण होते. या उलट ती लाऴ पटापट थूंकून टाकत राहील्यास पटकन उलटी होऊन जाते. याही तत्वाचा वापर करून उलटी होऊ दिली तेव्हा ते कमी त्रासाचे ठरले. पोटावर थंड पाण्याची पट्टी किंवा तेलाने मालीश हाही उपाय तडस होणारे दुःख कमी करण्यास उपयोगी पडतो. गेल्या वर्षभरांत निरनिराऴे पदार्थ गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खाल्ले गेल्याने जो त्रास झाला त्यावरून हा कोणत्या एका पदार्थाचा दोष किंवा ऍलर्जी नाही हे कऴले. शेंगदाणे, तूरडाऴ हे पित्तकर असले तरी पुलाव, दही-वडे हे पदार्थ पित्तकर नव्हते. आता या जास्त खाण्याच्या त्रासाच्या बाबत अनुभवाने मी बरीच तज्ज्ञता मिऴवली आहे व जिभेवर निय़ंत्रण हाच त्याचा उपाय हे मला पक्के समजले आहे.
---------------------------------------------------------

कोई टिप्पणी नहीं: