गुरुवार, 22 जुलाई 2021

 Do you know that the Constitution of India was written by hand ?No instrument was used to write the whole constitution. 


Prem Bihari Narayan Rayzada, a resident of Delhi, wrote this huge book, the entire constitution, in italic style with his own hands.


Prem Bihari was a famous calligrapher  of that time. He was born on 16th December,1901 in the family of a renowned handwriting researcher in Delhi. He lost his parents at a young age. His grandfather was Ram Prasad Saxena & uncle Chatur Bihari Narayan Saxena. His grandfather Ram Prasad was a calligrapher. He was a scholar of Persian & English. He taught Persian to high-ranking officials of the English government.


He  used to teach calligraphy to Prem Bihari from an early age for writing in a beautiful style.  After graduating from St. Stephen's College, Delhi, Prem Bihari started practicing the art of  calligraphy  learned from his grandfather. Gradually his name began to spread everywhere because of his beautiful handwriting. When the Constitution was ready for printing, the then Prime Minister of India, Jawaharlal Nehru summoned Prem Bihari. Nehru wanted to have the Constitution in handwritten calligraphy in italic letters instead of in print. 


That is why he called Prem Bihari. After Prem Bihari arrived, Nehruji asked him to write the Constitution in italic style & asked him what fee he would take.


Prem Bihari told Nehruji, “Not a single penny. By the grace of God I have all the things & I am quite happy with my life." After saying this, he made a request to Nehruji "I have one reservation - that on every page of Constitution I will write my name & on the last page I will write my name along with my grandfather's name." Nehruji accepted his request. He was given a house to write this Constitution. Sitting there, Premji wrote the manuscript of the entire Constitution.


Before starting writing, Prem Bihari Narayan came to Santiniketan on 29th November, 1949 with the then President of India, Shri Rajendra Prasad, at the behest of Nehruji. They discussed with the famous painter Nandalal Basu & decided how & which part of the leaf Prem Bihari would write on, & the part to be left blank for Nandalal Basu; who would decorate the rest of the blank part of the leaf.


Nandalal Bose & some of his students from Santiniketan filled these gaps with impeccable imagery. Mohenjo-daro seals, Ramayana, Mahabharata, Life of Gautam Buddha, Promotion of Buddhism by Emperor Ashoka, Meeting of Vikramaditya, Emperor Akbar & Mughal Empire, Empress Lakshmibai, Tipu Sultan, Gandhiji's Movement, Netaji Subhas Chandra Bose & Rupachitra is all reflected in their drawings.


All in all, it is a pictorial representation of the history & geography of India. They painted the pictures very thoughtfully according to the content & paragraphs of the constitution.


Prem Bihari needed 432 pen holders to write the Indian Constitution & he used nib number 303b. The nibs were brought from England & Czechoslovakia. He wrote the manuscript of the entire Constitution for six long months in a room in the Constitution Hall of India. 


Prem Bihari died on 17th February, 1986. The original book of the Indian Constitution is now preserved in the library of the Parliament House, Delhi. Later, a few books were published in print under the supervision of the Survey of India in Dehradun.


Within a vault-like room in the Library of the Parliament of India in New Delhi sit helium-filled cases - 30x21x9 inches. The temperature is fixed at 20°C (+/- 2°C) & a 30% (+/- 5%) relative humidity is maintained throughout the year. Within the nitrogen-laden case lies the 251-page bound manuscript. These pages are of  parchment. The Constitution is 22 inches long &16 inches wide. It's weight is 3 Kg. 650 gms. & its title is Constitution of India. It is the original manuscript of the Constitution of India that came into force on 26th January, 1950.


Political pundits count the 22 parts, 395 articles & 8 schedules of the original Constitution. But what catches the eye is its aesthetics. Beautiful borders on each parchment paper & words slanting artistically. The curl at the crown of the Bs & Rs, the neat loop at the beginning of U, perfectly coiled quotation marks & the perfect parentheses. Not one word misplaced, not one blotch of ink anywhere. The italics & the numbers so immaculately penned that it is difficult to surmise that it was written by man. A man named Prem Behari Narain Raizada (Saxena).


The Constitution of India is the longest hand written Constitution of any country in the world.


Hope it will update you.

*संजीवन समाधी

 *संजीवन समाधी घेतल्या नंतर शरीराचे काय होते?*

ह्याचे उत्तर म्हणून माझ्या वाचनात आलेली माहिती देत आहे.

*संजीवन समाधी*


नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था.पण *जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे.*


सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या सा-याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत.जसा त्यांचा जन्म अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीय आहे. *आजवर जगात केवळ भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी "संजीवन समाधी" घेतलेली आहे.*


सामान्यत: लोक जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गल्लत करतात.त्यामुळे कोणा महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधीच म्हणतात. वस्तुत: संजीवन समाधी ही जिवंत समाधी पेक्षा खूपच वेगळी आहे. *जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो.* परंतु या *संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, देहत्याग घडतच नसतो.* या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण आहे. नाथसंप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरुकृपेने ज्ञात असली तरी, *श्रीभगवंतांच्याच आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच त्या प्रक्रियेचा अवलंब करून तशी संजीवन समाधी घेतलेली आहे.* सर्व महात्म्यांनी मिळून तो केवळ श्री माउलींसाठीच एकमताने राखीव ठेवलेला विशेष अधिकार आहे,असे म्हणा हवे तर.


संजीवन समाधीच्या प्रक्रियेचा सूचक संकेत श्रीसंत नामदेव महाराजांनी माउलींच्या समाधिवर्णनाच्या आपल्या अभंगांत केलेला आहे.श्री नामदेवरायांच्या गाथ्यात "श्रीज्ञानदेव समाधिमहिमा" नावाचे आणखी एक स्वतंत्र प्रकरण आहे.यात प्रत्यक्ष भगवान श्रीपंढरीनाथच,संतांच्या प्रेमळ विनंतीवरून श्री माउलींचे व त्यांच्या समाधीचे माहात्म्य कथन करीत आहेत.या प्रकरणातही काही विशेष संदर्भ मिळतात.त्यात श्री सोपान देवांच्या समाधीचा उल्लेख करताना श्रीपांडुरंग म्हणतात की, "त्यावेळी हा ज्ञानदेवही दिव्यदेहाने आमच्यासारखाच सासवडला येईल तुझ्या समाधीसाठी." माउलींच्या संजीवन समाधीत त्यांचा देहत्याग घडलेला नाही, हेच देवही येथे सूचित करीत आहेत.


*सद्गुरु श्री माउलींच्या संजीवन समाधीबद्दलची विशेष ......*


सद्गुरू श्री माउलींनी श्रीभगवंतांना समाधीची परवानगी मागितल्यावर, देवांनीच त्यांना आळंदीच्या त्यांच्या स्थानाची माहिती दिली. म्हणजे माउलींना ते माहीत नव्हते असे नाही,पद्धत म्हणून त्यांनी देवांना त्याबद्दल विचारले. *आळंदीच्या सिध्देश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारे समाधिविवर हेच माउलींचे अनादिस्थान आहे. तेथेच त्यांनी या पूर्वी एकशे आठ वेळा समाधी घेतलेली असून ही त्यांची एकशेनववी वेळ होती समाधी घेण्याची,असे नामदेवराय सांगतात.* तेथूनच ते पुन्हा पुन्हा दरवेळी अवतार घेऊन येत असतात.देवांच्या सांगण्यानुसार नंदी हलवल्यावर खालचे विवर मोकळे झाले.नामदेवरायांच्या चारही पुत्रांनी ते स्वच्छ करून त्यातील चौथ-यावर मृगाजिन वगैरे घालून समाधीची सर्व सिद्धता केली.


आदल्या दिवशी,कार्तिक कृष्ण द्वादशीला प्रत्यक्ष श्रीभगवंतांनी स्वहस्ते दिव्य अन्न तयार करून माउलींना स्वत: भोजन वाढले . त्या अमृतमय अन्नामुळे माउलींच्या आत शरीरभर अमृतच तयार झाले.


*कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सकाळच्या वेळी माउलींची पूजा झाल्यावर,एकीकडून श्री निवृत्तिनाथ व एकीकडून श्रीभगवंतांनी हाताला धरून माउलींना त्या समाधि विवराच्या आत नेले.तेथील आसनावर बसून माउलींनी डोळे मिटून तीन वेळा नमस्कार केला,भीममुद्रा लावली आणि ते 'संजीवन समाधीत गेले.* त्यानंतर श्रीपांडुरंग व श्री निवृत्तिनाथ बाहेर आले.


*संजीवन समाधी साधण्यासाठी तत्त्वांचा तत्त्वांमध्ये नाथ संप्रदायोक्त पद्धतीने लय केला जातो.* सद्गुरु श्री माउलींनी समाधी विवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्त्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर, ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली. पृथ्वीतत्त्वाचा जलतत्त्वात, जलाचा अग्नीत,अग्नीचा वायूत व वायूचा आकाशतत्त्वात लय झाला.आकाशाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या आकाशाशी, चिदाकाशाशी तदाकार होऊन राहते. ही प्रक्रिया माउलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्ष पाहता आली. *पृथ्वी व जलतत्त्वाचा लय झाल्यावर माउलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्याजागी तेजोमय मूर्ती दिसू लागली.* तेजतत्त्वही लय पावल्यावर समोरची ती तेजाकृती देखील दिसेनाशी झाली व केवळ नादरूपाने प्रचिती शिल्लक राहिली.ते वायूतत्त्वही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व *माउलींची संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले.* "संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की,माउलींनी देहत्याग केला.याच्या उलट प्रक्रियेने त्यांना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर येता येते.मग ते जसे समाधीच्या पूर्वी होते तसेच पुन्हा आपल्याला दिसू लागतील.

"संजीवन सामाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिलेले आहेत.


जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात हाच फार मोठा फरक आहे. 'जातस्यहि ध्रुवो मृत्यु:' या नियमानुसार जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा पांचभौतिक देह कालांतराने विघटन पावतो,कारण तो असा तत्त्वांचा लय करून अदृश्य केलेला नसतो.ही माहिती नसल्यामुळेच सामान्यपणे लोक जिवंत समाधीला संजीवन समाधी म्हणतात.परंतु *आजवर केवळ आणि केवळ भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनीच अशी संजीवन समाधी घेतलेली आहे. म्हणूनच सद्गुरु श्री माउलींची ही संजीवन समाधी एकमेवाद्वितीय म्हटली जाते !* इथे कोणाही महात्म्यांची मी श्री माउलींशी तुलना करत नाहीये.जिवंत समाधी घेतलेले सर्व महात्मे श्री माउलींसारखेच थोर आणि पूजनीयच आहेत. फक्त जो वास्तविक भेद आहे दोन्हीतला तेवढाच मी येथे मांडत आहे.कृपया कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.


*श्रीसंत महात्मे यासाठीच श्रीक्षेत्र आळंदीला व सद्गुरु श्री माउलींच्या समाधीला "नित्यतीर्थ" म्हणतात. हे कधीच नष्ट न होणारे असे कालजयी तीर्थ आहे,म्हणूनच ते नित्यतीर्थ होय.* 

श्री माउलींचे समाधीविवर हे सूक्ष्म स्तरावरील आहे.तेथे पंचभौतिकताच नाही कसलीही. त्यामुळे तेथे प्रवेश करण्यासाठी आपला हा पांचभौतिक देह उपयोगाचा नसतो.तेथे केवळ दिव्य देहानेच प्रवेश होऊ शकतो.या समाधीविवराला कालाचा स्पर्शच नाहीये. *तिथे काळ कार्यच करीत नसल्याने, त्यावेळी आत वाहिलेली फुले आजही जशीच्या तशी टवटवीत आहेत.त्यावेळी ठेवलेला पंचखाद्याचा नैवेद्यही साडेसातशे वर्षे उलटली तरी जसाच्या तसाच आहे.*


सद्गुरु श्री माउलींच्या कृपेने या समाधिविवराच्या आत जाण्याचे सद्भाग्य आजवर केवळ बोटावर मोजण्या ईतक्या सत्पुरुषांनाच लाभलेले आहे.पण आश्चर्य म्हणजे या सर्व महात्म्यांनी आतील देखाव्याचे केलेले वर्णन शब्दश: एकच आहे. माउलींच्या समाधिसोहळ्यास श्रीसंत जनाबाई उपस्थित नव्हत्या. म्हणून त्या जेव्हा त्यानंतर पहिल्यांदा आळंदीला आल्या, त्यावेळी माउलींनी त्यांना संजीवन समाधीचा तो संपूर्ण सोहळा दिव्यदृष्टीने पुन्हा दाखवला होता. श्री माउलींचे त्यांच्यावर पुत्रवत् प्रेम होते, म्हणूनच जनाबाईंसाठी त्यांनी ही विलक्षण लीला केली.


श्रीसंत एकनाथ महाराजांचा प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच.माउलींच्या गळ्याला टोचणारी अजानवृक्षाची मुळी कापण्यासाठी ते या समाधी विवरात गेले होते.त्यानंतर साधारणपणे दोनशे वर्षांपूर्वी,श्री चिदंबर महास्वामींच्या शिष्या श्रीसंत विठाबाई महाराजांना श्री माउलींच्या कृपेने हे सद्भाग्य लाभले.


गंमत म्हणजे श्रीसंत विठाबाईंचे अभंग मला काही वर्षांपूर्वी वाचायला मिळाले होते.


सद्गुरु श्री ज्ञानदेवांच्या समाधिस्थ स्वरूपाविषयी आपल्या "श्रीज्ञानदेव विजय" ग्रंथातील ओळ


ज्ञानेशांची समाधिस्थिती ।


पुनश्च येणे देहावरती ।


याची घेतली प्रचिती ।


त्रिशतकोत्तर नाथांनी ॥१५.६३॥


पूर्वजांनी जया पाहिले ।


तया नाथांनीही देखिले ।


आजही तैसेचि संचले ।


समाधिस्थ ज्ञानेश्वर ॥१५.६५॥


भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हे नित्यअवतार असल्याने,आजही त्याच रूपाने समाधिस्थ राहून ते आपल्या भक्तांवर कृपाप्रसाद करीत आहेत. "कलियुगात देव एक ज्ञानेश्वर महाराजच आहेत."


सद्गुरु श्री माउली हे जसे एकमेवाद्वितीय ( Unique ) अवतार आहेत, तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीयच आहे. त्यांच्यासारखे केवळ तेच ! अलौकिक, अद्भुत, अनिर्वचनीय आणि अपरंपार कनवाळू !! त्यांचे पावन नाम घेण्याची, त्यांच्या दिव्य चरित्राचे अनुसंधान राखण्याची आणि त्यांचेच स्वरूप असणारे त्यांचे वाङ्मय वाचण्याची,त्याचे मनन-चिंतन करण्याची संधी व सद्बुद्धी दोन्ही आपल्याला लाभत आहे, हेच माउलींची आपल्यावर अद्भुत कृपा असल्याचे प्रतीक आहे, यात शंकाच नाही ! या देवदुर्लभ भाग्यासाठी परमकनवाळू करुणाब्रह्म भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीचरणीं, सर्वांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी दंडवत प्रणाम करून त्याच अनुपम-सुखदायक श्रीचरणीं, त्यांच्या महन्मंगल जयंतीपर्वाच्या पूर्वसंध्येला तुलसीदल रूपाने विसावून धन्य होतो !