मागच्या
लेखात म्हटल्या प्रमाणे ऍक्युप्रेशर या पद्धतीचा सिद्धांत असा की, आपल्या शरीरातील विशिष्ट केंद्र बिंदूंवर विशिष्ट दाब दिल्याने त्या ठिकाणी अडकून पडलेल्या शक्तीचा
प्रवाह व्यवस्थीतपणे सुरू होतो. अशा तर्हेने पूर्ण शरीरभर शक्तीचा प्रवाह नीट चालू
होऊन त्यामुऴे शरीरातील इतर ठिकाणी उत्पन्न झालेल्या व्याधी आटोक्यात येतात. मसाज
थेरपी व ऍक्युप्रेशर या दोन क्रियांमध्ये फरक असा की ज्या भागांत शरीराला दुखापत
झाली किंवा जडपण जाणवत असेल त्या ठिकाणी मसाज केल्याने तेथे हलकेपणा व स्फूर्ती
निर्माण होतात. आणि अशा हलकेपणा व स्फूर्तीमुऴे एका प्रकारे संपूर्ण शरीरातील
आरोग्य टिकून राहते. मात्र ऍक्युप्रेशरचे वैशिष्ठ्य असे की एका केंद्रावर दाब
देवून दुसऱ्या केंद्रावर प्रभाव निर्माण होतो व तेथील कार्यक्षमता वाढते.
योगासनामध्ये
देखील थोडा फार ऍक्युप्रेशरचाच सिध्दांत
वापरलेला आहे. सर्व योगासने व कित्येक योगीक क्रिया या शरीरातील विशिष्ठ्य केंद्रांचे
सामर्थ्य वाढविण्यासाठी असतात. योगासनाच्या सिध्दांता प्रमाणे शरीरात सात
अतीमहत्वाची केंद्रे आहेत जिथून मेंदूकडे संवेदनांची वाहतूक करणार्या नाड्यांचा
प्रवाह सुरू होतो. अशा प्रकारे शरीरात मुलाधार स्वाधिष्ठान, मणीपूर, अनाहत,
विशुध्द व आज्ञा अशा सहा चक्रांची कल्पना केलेली असून या प्रत्येक केंद्रावर मोठ्या प्रमाणात संवेदना
वाहक नाड्यांचे जाऴे असून त्यांचे नियमन होत असते. या प्रत्येक चक्रात एक-एक
शक्तीचे उगम स्थान असून त्या सर्व शक्तींचे परमस्थान हे मेंदूत असलेल्या एका
सातव्या चक्रात ज्याला सहस्रार चक्र म्हणतात, तिथे अशी कल्पना केलेली आहे. योगासने
करण्याने शरीराच्या ज्या त्या अवयवांना योग्य तो ताण मिऴत असतो व एक प्रकाराने
मसाज किंवा मर्दनची क्रियाच पार पाडली जात असते. तरीही योगसनांचा दुसरा परीणाम असा
होतो की विशिष्ठ आसनांमुऴे शरीरातील विशिष्ठ चक्र किंवा शक्ती केंद्र जास्त
कार्यक्षम होते.
योगासनांमध्ये मुद्रा हा एक विशिष्ठ प्रकार सांगीतलेला आहे. उदा- सिंहमुद्रा, शांभवी मुद्रा इत्यादी. त्याच त्याच जोडीला काही विशिष्ठ हस्तमुद्रा देखील सांगीतल्या आहेत. उदा- ज्ञान मुद्रा, शंख मुद्रा इत्यादी. हस्त मुद्रामुऴे तऴ हातावरील विशेष केंद्र बिंदूवर विशेष दाब पडतो व ऍक्युप्रेशरच्याच सिध्दांता प्रमाणे त्याचाही परीणाम शरीरातील इतर अवयवामध्ये व्याधी दूर होऊन आरोग्य निर्माण होणे असाच असतो, असे वर्णन केले आहे. याचाही जास्त अभ्यास व पडताऴा या क्षेत्रातील जिज्ञासू व्यक्तींना घेण्याची आवश्यकता आहे. ऍक्युप्रेशरच्या सिध्दांतात तसेच वर नमूद केलेल्या कित्येक हस्तमुद्रांमध्ये दाब निर्माण करणे ही महत्वाची प्रक्रीया आहे. परंतू काही हस्तमुद्रा या दाबाने परीणामकारक ठरत नसून अनुभूतिने परिणाम करतात असा या क्षेत्रातील जाणकारांचा दावा आहे. उदा- ज्ञान मुद्रा. यामध्ये तऴ हात संपूर्ण उघडा करून अंगठा व तर्जनी या बोटांच्या वरच्या पेरातील उंचवट्यांचा एकमेकांना स्पर्ष करावा व इतर तिन्ही बोटे एकमेकांना चिटकवून सरऴ उघडी ठेवावीत असे सांगीतले आहे. आशीर्वाद देण्यासाठी या मुद्रेचा वापर करतात. याबाबत असे वर्णन वाचले आहे की अंगठा व तर्जन यांचा एकमेकांना होणारा स्पर्ष इतका अलगद असावा की त्यामधून एक अत्यंत आनंददायी अनुभूती निर्माण व्हावी व संपूर्ण लक्ष त्या स्पर्षाचा अलगदपणा टिकवण्या मध्येच केंद्रीत असावे जेणेकरून त्या अनूभूतीचा प्रत्यय घेता य़ेईल. अशी अवस्था सिध्द झाल्यास तर्जनीच्या टोकाला नाडीचे स्पंदन स्पष्टपणे ऐकू येते. याचे कारण असे की शरीरातील सूक्ष्मात सूक्ष्म अशा प्रवाहांबाबत आपण संवेदनक्षम झालेलो असतो. व ते प्रवाह आपल्याला ओऴखता येतात. या सर्व सिध्दांताबाबत मला वेगऴा अनुभव मिऴाला. गोव्यामध्ये निसर्गोपचार करणारे एक तज्ञ मला भेटले, त्यांनी त्यांच्याकडील रोग्यांसाठी ते ऍक्युप्रेशरसारखीच परंतू थोडी वेगऴी पध्दत वापरतात असे सांगितले. ऍक्युप्रेशरमध्ये सांगीतलेल्या केंद्रांचाच ते देखील वापर करतात परंतू जास्तीत जास्त दबाव देण्याचे तंत्र न वापरता त्या त्या केंद्रावर अत्यंत हलकेपणाने फक्त स्पर्श करणे अशी पध्दत ती वापरतात. कित्येकदा हा स्पर्श फक्त त्या केंद्राच्या पुरताच मर्यादीत न ठेवता त्या केंद्राच्या आजूवाजूच्या थोड्याश्या भागांमध्ये देखील हलके पणाने स्पर्श करतात यामुऴे ते केंद्र व त्याच्या जवऴपासचे क्षेत्र अतीसंवेदनक्षम होते. थंडीत कित्येकदा हाताच्या व पायाच्या बोटांमध्ये विशेषतः सांध्याच्या ठिकाणी दुखण्याचा त्रास कित्येकांना होत असतो अशा वेऴी आपल्या डाव्या हाताच्या बोटानी उजव्या हाताच्या बोटाना अत्यंत अलगदपणे कुरवाऴले तर त्याचाही उपयोग होतो. या शीवाय जखम होऊन सुज आली असेल तर तो ठणका जाण्यासाठी देखील याच पध्दतीचा वापर करता येतो. असे कित्येक अनोखे प्रयोग त्यांनी मला ऐकवले. याचा उपयोग मी स्वतः 3-4 वेऴा खांदे दुखी, बोटामधील सांधे दुखी व माथ्यावरील कवटीमध्ये थोडेफार दुखत असताना करून बघीतला व त्याचा फायदा मिऴाला.
यावरून मला
असे वाटते की शरीरातील विभीन्न भाग संवेदनक्षम झाल्याने त्या ठीकाणच्या रोगावर
काहीतरी चांगला परीणाम होत असावा. असे वाटण्याचे दुसरे कारण असे की ध्यान या
प्रकारात शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रीत करून त्या त्या अवयवातील
अनुभूती जाणून घेण्याचा प्रयत्न करणे या क्रीयेला फार महत्व सांगीतलेले शवासन
किंवा जैनांच्या प्रणालीत सांगीतलेली कार्योत्सर्ग ही प्रक्रीया किंवा बुध्दांच्या प्रणालीत सागीतलेली विपश्यना
ही क्रीया या तीघांमधील पहीली पायरी म्हणजे शरीरातील प्रत्येक अवयवावर ध्यान
केंद्रीत करून तेथील अनुभूती समजून घेणे. पुढील जी ज्ञानप्राप्ती करावयाची आहे व
त्यासाठी मनावर बुध्दीवर किंवा प्रज्ञेवर जे ध्यान केंद्रीत करावयाचे आहे तो टप्पा
गाठण्यापुर्वी शारीरीक टप्पा गाठणे हे आवश्यक मानले जाते. यावरून असे वाटते की
शरीर नीरोगी असेल, व प्रत्येक अवयवातील शक्तीचा किंवा चैतन्याचा प्रवाह अनिर्बध
रहात असेल, त्यामध्ये हलकेपणा असेल तेव्हाच खर्या अर्थीने व संपूर्णपणाने ज्ञान
प्राप्ती अगर साक्षात्कार होऊ शकतो. शरीराची निरोगीता स्पर्शाद्वारे वाढवणे, मग तो
स्पर्श दाब देऊन असेल अगर हलकेपणाचा असेल, हे एक समान सूत्र वरील सिध्दांतामध्ये
दिसून यते.
योगासनांमध्ये मुद्रा हा एक विशिष्ठ प्रकार सांगीतलेला आहे. उदा- सिंहमुद्रा, शांभवी मुद्रा इत्यादी. त्याच त्याच जोडीला काही विशिष्ठ हस्तमुद्रा देखील सांगीतल्या आहेत. उदा- ज्ञान मुद्रा, शंख मुद्रा इत्यादी. हस्त मुद्रामुऴे तऴ हातावरील विशेष केंद्र बिंदूवर विशेष दाब पडतो व ऍक्युप्रेशरच्याच सिध्दांता प्रमाणे त्याचाही परीणाम शरीरातील इतर अवयवामध्ये व्याधी दूर होऊन आरोग्य निर्माण होणे असाच असतो, असे वर्णन केले आहे. याचाही जास्त अभ्यास व पडताऴा या क्षेत्रातील जिज्ञासू व्यक्तींना घेण्याची आवश्यकता आहे. ऍक्युप्रेशरच्या सिध्दांतात तसेच वर नमूद केलेल्या कित्येक हस्तमुद्रांमध्ये दाब निर्माण करणे ही महत्वाची प्रक्रीया आहे. परंतू काही हस्तमुद्रा या दाबाने परीणामकारक ठरत नसून अनुभूतिने परिणाम करतात असा या क्षेत्रातील जाणकारांचा दावा आहे. उदा- ज्ञान मुद्रा. यामध्ये तऴ हात संपूर्ण उघडा करून अंगठा व तर्जनी या बोटांच्या वरच्या पेरातील उंचवट्यांचा एकमेकांना स्पर्ष करावा व इतर तिन्ही बोटे एकमेकांना चिटकवून सरऴ उघडी ठेवावीत असे सांगीतले आहे. आशीर्वाद देण्यासाठी या मुद्रेचा वापर करतात. याबाबत असे वर्णन वाचले आहे की अंगठा व तर्जन यांचा एकमेकांना होणारा स्पर्ष इतका अलगद असावा की त्यामधून एक अत्यंत आनंददायी अनुभूती निर्माण व्हावी व संपूर्ण लक्ष त्या स्पर्षाचा अलगदपणा टिकवण्या मध्येच केंद्रीत असावे जेणेकरून त्या अनूभूतीचा प्रत्यय घेता य़ेईल. अशी अवस्था सिध्द झाल्यास तर्जनीच्या टोकाला नाडीचे स्पंदन स्पष्टपणे ऐकू येते. याचे कारण असे की शरीरातील सूक्ष्मात सूक्ष्म अशा प्रवाहांबाबत आपण संवेदनक्षम झालेलो असतो. व ते प्रवाह आपल्याला ओऴखता येतात. या सर्व सिध्दांताबाबत मला वेगऴा अनुभव मिऴाला. गोव्यामध्ये निसर्गोपचार करणारे एक तज्ञ मला भेटले, त्यांनी त्यांच्याकडील रोग्यांसाठी ते ऍक्युप्रेशरसारखीच परंतू थोडी वेगऴी पध्दत वापरतात असे सांगितले. ऍक्युप्रेशरमध्ये सांगीतलेल्या केंद्रांचाच ते देखील वापर करतात परंतू जास्तीत जास्त दबाव देण्याचे तंत्र न वापरता त्या त्या केंद्रावर अत्यंत हलकेपणाने फक्त स्पर्श करणे अशी पध्दत ती वापरतात. कित्येकदा हा स्पर्श फक्त त्या केंद्राच्या पुरताच मर्यादीत न ठेवता त्या केंद्राच्या आजूवाजूच्या थोड्याश्या भागांमध्ये देखील हलके पणाने स्पर्श करतात यामुऴे ते केंद्र व त्याच्या जवऴपासचे क्षेत्र अतीसंवेदनक्षम होते. थंडीत कित्येकदा हाताच्या व पायाच्या बोटांमध्ये विशेषतः सांध्याच्या ठिकाणी दुखण्याचा त्रास कित्येकांना होत असतो अशा वेऴी आपल्या डाव्या हाताच्या बोटानी उजव्या हाताच्या बोटाना अत्यंत अलगदपणे कुरवाऴले तर त्याचाही उपयोग होतो. या शीवाय जखम होऊन सुज आली असेल तर तो ठणका जाण्यासाठी देखील याच पध्दतीचा वापर करता येतो. असे कित्येक अनोखे प्रयोग त्यांनी मला ऐकवले. याचा उपयोग मी स्वतः 3-4 वेऴा खांदे दुखी, बोटामधील सांधे दुखी व माथ्यावरील कवटीमध्ये थोडेफार दुखत असताना करून बघीतला व त्याचा फायदा मिऴाला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें