रविवार, 8 सितंबर 2013

भाग 16 ऍक्यूप्रेशर

भाग 16 ऍक्यूप्रेशर

ऍक्युप्रेशरचा समावेश निसर्गोपचारांत कारावा की नाही याबाबत थोडेसे वाद आहेत. मी मागे उल्लेख केल्याप्रमाणे एकोणवीसाव्या शतकांत जेव्हा ऍलोपथी देखील प्राथमीक अवस्थेत होती आणि जर्मनीमध्ये पर्यायी उपाय शोधण्याकडे लोकांचा जास्त कल होता, त्यातून प्ररणा घेऊन औषध विरहीत अशा निसर्गोपचार तत्वाचा उदय झाला. त्यामध्ये सुरूवातीला आहार नियमन, योग्य व्यायाम, पाणी, भाजी, सुर्य, खुली हवा यांचा आरोग्यासाठी वापर इत्यादी बाबी पुढे आल्या. त्याच सुमारास भौतीक शास्त्र देखील प्रगत होत होते. त्यामध्ये चुंबक, वीज इत्यादी विषयांवर बरेच प्रयोग होत होते.  भौतीक शास्त्राच्या प्रयोगांच्या काटेकोर मोजणीसाठी बनवलेला थर्मामीटर तितक्याच सहजतेने रोग्याचे तापमान मोजन्यासाठी पण वापरला जाऊ शकतो, याचा उपयोग डॉक्टरांनी लगेच केला. त्याचप्रमाणे मॅग्नेटची थिरपी, इलेक्ट्रोथीरपी, एवढेच नाही तरी रंगाची थिरपी असे प्रयोग देखील होऊ लागले. विशेष म्हणजे या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही मिऴाले.
जर्मनीमधून निसर्गोपचाराचे शास्त्र पसरले आणि अमेरीकेत पोहोचेल. त्याचबरोबर हऴू हऴू औषध विरहीत थिरपी ही संकल्पना लोकांना आवडू लागली होती त्यामुऴे कित्येक वेगऴे प्रकार पुढे येऊ लागले. मसाज थीरपी हा त्यातला एक. मानसशास्त्राने रोगी बरे करणे हा दुसरा आणि आता तर अगदी फेथ हीलींगने देखील रोगी बरे केले जातात असं ऐकायला मिऴतं. म्हणून 1802 मध्ये अमेरीकेत सर्व निसर्गोपचारकांचा एक मोठा मेऴावा आयोजीत करण्यांत आला असताना निसर्गोपचाराची सर्व समावेशक व्याख्या करून जिथे जिथे आधुनीक मेडीकल शास्त्राला मान्य असलेल्या गोऴ्या इंजेक्शन न देता रोग्यावर उपचार केले जातात ते सर्व निसर्गोपचार अशी एक व्याख्या सम्मत झाली. या उलट काही कट्टर निसर्गोपचारकांना फक्त आहार नियमनातून उपचार एवढाच अर्थ मान्य असून इतर सर्व प्रकारच्या चिकीत्सेला मग ती पाण्याची असेल, मसाजची असेल अगर फेथ हीलींग असेल त्या सर्वांना विरोध आहे.
      कालांतराने जसे अमेरीकेत आशीयायी देशांबद्दल विशेष माहीती मिऴून तिकडील तत्वज्ञान आणि पद्धतींची चर्चा होऊ लागली तशी चीन, जापान, तिबेट इत्यादी देशांत प्रसिद्ध असलेले ऍक्युपॅक्चर व ऍक्युप्रेशर हे दोन प्रकारही रोगावरचे उपाय म्हणून स्वीकारले जाऊन निसर्गोपचाराच्या सर्वसमावेशक व्याख्येमध्ये या दोन पद्धती शामील करण्यांत आल्या. त्यापैकी ऍक्युप्रेशर ही पद्धत वापरायला जास्त सोपी असल्याने तिचा प्रचार जास्त जोराने झाला. या पद्धतीची विचारसरणी अशी आहे की आपल्या शरीरात जागोजागी महत्वाची ठीकाणे किंवा केंद्र आहेत. शरीरभर वेगवेगऴी जाऴी विणलेली आहेत. रक्त नलीकांचे एक जाऴे तर नसांचे दुसरे जाऴे यातील जी काही दोन किंवा जास्त नाड्यांची जंक्शन्स असतात त्यांना विशेष महत्व असते. आपल्या शरीरातले चैतन्य या मसांमधून खेऴत असते. मात्र एखाद्या जंक्शन मध्ये किंवा एरवी देखील  या शक्तीप्रवाहाला काही अडथऴे निर्माण होतात. अशावेऴी शरीरांत कुठेतरी रोग उद्भवतो. शक्तीप्रवाहातील अडथऴा दूर केला की रोगही बरा होतो.
       असे अडथऴे दूर करण्यासाठी शरीरातील महत्वाच्या केंद्रांना सतत साफ ठेवावे लागते. यासाठी तीथे सुया टोचून ठेवणे म्हणजे ऍक्युपंक्चर याऐवजी  त्या त्या केंद्रावर दाब देणे म्हणजे ऍक्युप्रेशर. ऍक्युप्रेशर मधे तऴहात आजी तऴपाय यांना विशेष महत्व आहे कारण या दोन्ही ठीकाणांवर आपल्याला उंचवटे दिसतात. हे उंचवटे शरीराच्या विभीन्न अवयवांचे प्रतिबींब मानले जातात आणि वेगवेगऴे उंचवटे दाबून शरीरातील वेगवेगऴे रोग दूर होतात असेही मानले जाते. मसाज थीरपी आणि  ऍक्युप्रेशर मधील महत्वाचा फरक असा की मसाज थीरपी मध्ये ज्या अवयवाचा रोग असेल त्यावरच मसाज केला जातो. ऍक्युप्रेशर मधे रोगाची जागा वेगऴी पण दबावाचे केंद्र वेगऴे असा प्रकार असतो. ऍक्युप्रेशर वापरून दीर्घ मुदतीचे व पूर्ण शरीर व्यवस्था बिघडवणारे आजार उदा. सांधीवात किंवा डायबीटीज देखील बरा केल्याची उदाहरणे आहेत परंतू डायबीटीज आणि मसाज थीरपी वापरली जात नाही हा एक मुद्दा आहे शरीराची चांगली मसाज केल्याने शांत झोप लागते तसेच तऴपाय किंवा डोकं चेपून पण चांगली झोप लागते आणि पूर्ण गाढ झोप मिऴाल्याने शरीराचे रोग दूर होण्यासाठी नक्की मदत होते. भारतात ऍक्युप्रेशरची काय स्थीती आहे…. कायद्याच्या भाषेत बोलायचे तर सरकारने निसर्गोपचार ही एक  आजार बरी करणारी आरोग्य राखणारी पद्दत आहे हे तत्वता मान्य केले आहे. ते करताना निसर्गोपचार या शब्दाच्या व्याख्येत ऍक्युप्रेशरचा समावेश पण केलेला आहे. मात्र ऍक्युप्रेशर तज्ञ कोणाला म्हणायचे त्याला सर्टिफिकेट किंवा रजिस्ट्रेशन कोणत्या पद्दतीने द्यायचे याबाबतचे नियम अजून ठरलेले नाहीत.
        कायद्यातली अडचणीची दुसरी बाजू अशीही आहे की एखाद्याने मी तुला ऍक्युप्रेशरने बरे करतो असे म्हटले व प्रत्यक्ष बरा करू शकला नाही तर त्याच्यावर खटला कोणत्या कायद्याखाली व कोणत्या गुन्ह्यासाठी भरणार.... कारण त्याने जे काही केले होते ते मेडीकल शास्त्राच्या व्याख्येत मेडीसीन म्हणून बसत नाही. मात्र ऍक्युप्रेशरची प्रॅक्टीस करणारे भारतात व पाश्चात्य देशांतही आहेत. त्यांची संख्या फार कमी आहे.(भारतात अंदाजे दोनशे) त्यांच्याकडे जाणारे रूग्ण अत्यंत कमी असतात. कित्येकांना चांगला अनुभव येतो. मात्र याचे वैज्ञानीक पद्दतीने रेकॉर्ड सहसा कोणी ठेवत नाही. रोगी जर ऍक्युप्रेशरने बरा झाला असेल तर त्याचा मुऴ रोग कोणता होता, किती जुना, त्रास नेमका काय व कीती प्रमाणात होता आणि बरा होताना तो कसा कसा बरा झाला, किती वेऴ लागला, बरा झाल्याचे कसे ठरवले इत्यादी बाबत संख्यात्मक माहीती नसेल तर त्या चीकीत्सेचे महत्व कमी होऊन बसते.

         मात्र सर्व एशीयायी देशांमध्ये ही पद्धत फार पूर्व काऴापासून वापरली जात असल्याने या विषयावर खूप पुस्तके वाचायला मिऴू शकतात. या पद्धतीचा व योगातील काही पद्धतींचा पण काय संबंध आहे ते पुढील लेखात पाहू......... 
--------------------------------------------------------- 
  A good bit of info from Raghvendrachar ji. Me too have this text vijnana bhairava tantra (vbt) with me. Osho spoke a lot about this text in his discourses and texts.
Love and regards,
Sreenadh
(WHO IS SREENATH ?)

--- On Fri, 3/12/10, raghavendra char <sujokachar@gmail.com> wrote:

From: raghavendra char <
sujokachar@gmail.com>
Subject: Fwd: acupuncture is vb tantra - sloka 93
To: sreesog@yahoo.com
Date: Friday, March 12, 2010, 12:18 PM

there is an ancient sanskrit text called vijnana bhairava tantra (vbt).  this is known as a yogic book.  but many people are not aware that this is also an acupuncture book.  acupuncture is a therapy based on panchamahabhutha (pmb) - five-element - principles.   this india-born chikitse exported to china in ancient times.  india has lot this knowledge completely, whereas china has preserved this, improved upon it and most importantly, practicing acupuncture even today.  hence, it is called as chinese medicine.
 
pmb is a vedic cosmology.  therefore, all the vedic and upanishad texts tells the story of pmb in different manners.  acupuncture tells that pmps are spread all over the human body in the name of aksharas, mantras, marmas, vital centres of prana, etc.  vbt tells the same thing and it offers methods to release the prana blocked in the different body parts.  let us see what sloke 93 of vbt says:
 
kinchidangam vibhidyaadau teekshnasoochyaadinaa tatah;
tatraiva chetanaam yuktvaa bhairave nirmalaa gatih.
 
the meaning of the above sloka is that insert a sharp needle on the body parts, so that blocked prana starts flowing freely to the whole body.  since acupuncture tells the same, this is an acupuncture sloke.
 
many slokas in vbt are acupuncture slokas;  although it is a yogic book.  acupuncture and yoga are two faces of a coin.  acupuncture tells that this human body is nothing but the playground for prana to unfurl cosmic manifestation.  
 
raghavendrachar
yoga shikshak & sujok acupuncturist
bangalore - india.
    
health capsule:  the times of india, bangalore - 20th may 2010 - page 15:
is there an alternative to antibiotics for urinary tract infections?
try acupuncture.  94 women with utis were studied by researchers in norway.  those who received acupuncture twice a week for a month had a uti recurrence rate 50% lower than those who weren't treated.











कोई टिप्पणी नहीं: