निसर्गोपचारामध्ये
सुर्य आणि सुर्य प्रकाश या दोन्ही गोष्टींना अत्यंत महत्व आहे. आपली प्रुथ्वी ही
सतत सुर्याभोवती फिरत असते. सुर्याकडून मिऴणारा उजेड व उष्णता यामुऴे प्रुथ्वीवर निसर्गाचे
नियमन होत असते. सुर्याचा आरोग्य रक्षणासाठी तसेच रोग बरे होण्यासाठी विशेष
पध्दतीने उपयोग करून घेता येतो. पूर्व आणि पश्चीम क्षितीजावर सुर्य असतो त्याचे जे
लाल बिंब आपल्याला दिसते त्याचा जास्त चांगला उपयोग आरोग्यासाठी करून घेता येतो.
कारण त्यातून आपल्याला मिऴणारे किरण हे कोवऴे असतात म्हणजेच त्यांच्यामध्ये नील व
अतीनील किरणांची टक्केवारी कमी झाल्यामुऴे त्यातील बरीच उष्णता अडवली जाऊन आपल्या
सहन होईल एवढीच उष्णता त्या किरणांमध्ये राहीलेली असते. अशा सुर्य बिंबामध्ये तीन
पध्दतीने व्यायाम करता येतो. पहिला व्यायाम हा सुर्यनमस्काराचा आहे. दुसरा व्यायाम
म्हणजे डोऴ्यांचा व्यायाम, यामध्ये सुर्याच्या लाल बिंबाकडे टकलावून पाहणे किंवा
डोऴ्यावर हात ठेऊन त्या बोटाच्या फटीतून येईल एवढाच सुर्यप्रकाश डोऴ्यांवर घेणे
असे वेगवेगऴे उपाय करता येतात. त्याचप्रमाणे लांब अंतरावरील सुर्याकडे बघणे व
द्रुष्टी एखाद्या झाडाच्या डेर्यावर स्थीर करणे व मग पुन्हा सुर्याकडे बघणे व
पुन्हा झाडाकडे बघणे असे लांबच्या अंतरावर द्रुष्टी स्थार करण्याचा व्यायाम देखील
करता येतो. सुर्यकिरणांचा तिसरा उपयोग म्हणजे सुर्य स्नान. एखाद्या व्यक्तीली
सुर्य स्नान ध्यावयाचे असेल तेव्हा एका काऴ्या घोंगडीवर चादर टाकून त्यावर हिरवा
पाला अंथरावा. यासाठी केऴीची मोठी पाने किंवा कडूलिंबाची पाने ही सर्वात चांगली.
या पानावर त्या व्यक्तीला झोपवून त्याचे सर्व अंग पानांनी झाकून द्यावे व त्या
भोवती ओली चादर घट्ट लपेटून द्यावी त्यानंतर वर काऴी घोंगडी टाकून सदर व्यक्तीस
त्यावर स्वस्थ पडू द्यावे. हे करीत असतांना त्याच्या कपाऴावर व डोक्यावर ओला टॉवेल
गुंडाऴून ठेवावा तसेच त्याला पोटभर पाणी पिऊ द्यावे. तसेच तोंडावर कुठल्याही
परीस्थीतीत ऊन पडणार नाही याची काऴजी घ्यावी. मात्र शरीराच्या इतर भागावर
सुर्यप्रकाश पूर्णपणे पडू द्यावा. या प्रयोगात वरून काऴी घोगडी किंवा पांढरी चादर
न लपेटता फक्त केऴीच्या पानामध्ये त्या व्यक्तीची देह गुंडाऴून चालतो. मात्र अश्या
पानांचा थर पुष्कऴ जाड असावा.
या शिवाय सदर
व्यक्तीला सर्व अंगावर गाऴलेल्या ओल्या मातीचा लेप देऊन त्याला एक दोन तास
ऊन्हात बसू देण्याने माती व सुर्यप्रकाश
या दोघांचे चांगले परीणाम शरीरावर घडून येतात. सुर्य स्नानाच्या अश्या सर्व
पध्दतीमध्ये तोंडावर व डोक्यावर सुर्याचे ऊन लीगू देऊ नये व डोक्यावर ओला टॉवेल
कायमपणे ठेवावा.
मातीचा वापर जेंव्हा निसर्गोपचाराच्या इतर कामासाठी केला
जातो उदा- पोटावर मातीची पट्टी देणे किंवा तोंडाला मातीचा लेप लावणे इत्यादी,
तेव्हा ती माती तयार करण्यासाठी सुर्यप्रकाशाचा उपयोग करतात. नवीन आणलेली माती
किंवा एकदा वापरलेली माती पुन्हा 3-4 दिवस कडक सुर्यप्रकाशात तापवल्याने ती माती
पुन्हा एकदा निसर्गोपचारात वापरता येऊ शकते.
आपल्या घरात
सुर्यप्रकाश सातत्याने येऊ द्यावा असे आपण ऐकतो. घराची रचना अशी असावी की त्यातील
प्रत्येक कानाकोपर्यात व विशेषतः संडास, बाथरूम, स्वयंपाक घर यामध्ये जास्तीत
जास्त काऴ सुर्यप्रकाश येत राहील अशीरचना असावी. फक्त ऊन्हाऴ्यामध्ये दुपारी ऊनाची
तीव्रता जास्त असते त्या वेऴेपुरता सुर्यप्रकाश घराबाहेर आडवणे हे चालू शकते. एरवी निदान काचेतून सुर्य
प्रकाश
जास्त प्रमाणात घरात यावा अशी घराची रचना असावी.
आपत्याकडे नवीन घरे वा ऑफीसेस बांधत असताना त्यामध्ये
निश्चीतपणे एअर कंडीशनर बस,वला जाणार या द्रुष्टीने नियोजन व डिजाईन करण्याची नविन
पध्दत चालू झालेली आहे. यामुऴे ऑफीसमध्ये व घरात फॉल्स सिलींग, घराची दारे कायम
बंद, खोल्यांमध्ये कायमपणे एअर कंडीशनर व खिडकी असेल तर तीच्या काचेवर फिल्म लाऊन
सुर्य प्रकाश कमी करणे इत्यादी प्रकार केले जातात. ही एक अनिष्ठ व आरोग्याला बाधक
अशी प्रव्रुत्ती आहे. प्रखर सुर्यप्रकाशाने जेवढ्या मोठ्या प्रमाणात व चांगल्या
प्रकारे निर्जंतूकीकरण होते तेवढे अन्य कोणत्याही प्रकाराने होत नाही. दिवसा एअर
कंडीशनर व दिव्यांचा वापर करून आपण विजेचा अपव्यय देखील करत असतो. त्याच प्रमाणे
सुर्यप्रकाशाला लांब ठेऊन आपण कित्येक वर्म रोग व ह्रदय रोगाला आमंत्रण देत असतो.
वैदीक काऴापासून व आयुर्वेदात सुर्याची महीमा गात असत.
सुर्याचे ह्रदयावर नियंत्रण असून तो ह्रदयरोगांना दूर ठेवतो असे म्हटलेले आहे.
ज्यांचे ह्रदय नाजूक नसेल त्याने महीन्यातून एकदा वरील प्रकारे सुर्य स्नान आवश्य
करावे. तसेच सुर्याच्या कोवऴ्या ऊन्हात सुर्य नमस्कार करीत राहील्याने ह्रदयास
विशेष मजबूती प्राप्त होते. सुर्याच्या ऊन्हाचा वापर आपण घरातील कपडे, गाद्या
इत्यादींना ऊन देण्यासाठी करतो.आयुर्वेदात सुर्याच्या ऊन्हात तयार केलेला मुरंबा
किंवा इतर खारावलेल्या पदार्थांना विशेष महत्व दिले जाते. साठवण खरण्यासाठी
धान्यदेखील आपण ऊन्हात वाऴवून ठेवतो.
आधुनीक काऴात सुर्याचा एक वापर आपल्याकडून राहून जात आहे हे
नमूद करणे आवश्यक आहे. तो म्हणजे भाज्या व फऴे यांच्या वाढण्यात व पिकण्यात असणारा
सुर्यप्रकाशाचा सहभाग. कित्येक भाज्या व विशेषता फऴे यांना एका विशिष्ट प्रखरते
खेरीज गोडी येत नाही. ऊन्हाऴ्यांत पिकणार्या सर्व फऴांना हा नियम विशेष करून लागू
पडतो. आंबा, द्राक्षे, कलींगड, खरबूज, फणस, बोर इ. फऴांमध्ये जी नैसर्गिक गोडी
सुर्याच्या प्रखर ऊन्हामुऴे येते ती इतर उपायांनी येऊ शकत नाही. या सर्व फऴांचा
खाद्य पदार्थामध्ये जसा उपयोग आहे तसाच त्यांचा औषधांमध्ये बराच उपयोग होतो. परंतू
हा त्यांचा औषधी गुण जर ते त्यांच्या त्यांच्या योग्य मोसमांत वाढवू दिले व पिकू
दिले तरच टिकून असतो. आधुनीक क्रुषी तंत्रामुऴे बाजारात सिजनच्या कितीतरी अगोदर
फऴे विक्रीकरीता येतात. त्यामुऴे उत्पादक शेतकर्याला फार मोठा मोबदला मिऴतो हे जरी
खरे असले तरी अशी फऴे खाल्याने त्यांचा हटकून त्रास होतो. त्याचे कारण एक तर ते फऴ
मोसमाच्या आधी तयार होण्यासाठी क्रुत्रीम रसायने व खताचा वापर केलेला असतो. ती
रसायने त्यांच्या त्या परीणामासकट फऴात उतरतात. या शिवाय त्या फऴामधील पिकणयाची
अंतर्गत प्रक्रीया पूर्ण होण्यासाठी व फऴात साखर गोडी निर्माण होण्यासाठी जी
प्रक्रीया पूर्ण व्हावी लागते त्यासाठी जी सुर्य काशाची आवश्यकता असली तरी ती गरज
इतर कुठल्याही रासायनीक खतातून भरून निघू शकत नाही. ही सुर्य प्रकाशाची गरज पूर्ण
न होताच जर ते फऴ क्रुत्रीम उपायांनी पिकवले तर त्यातील गोडी तसेच त्यातील आरोग्यकारक गुण संपून आरोग्यावर त्यांचा निश्चितपणे दुष्परिणाम होतो. याबाबत आपल्या देशांत अद्यापि म्हणावी तशी जागृति झालेली नाही. पश्चिमेतील देशांत मात्र ही जागृति निश्चितपणे झालेली दिसून येते. त्यांच्या देशांत आपली फळे निर्यात करताना