बुधवार, 24 अक्तूबर 2018

*गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?*


*गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?*


"गोहत्या बंदी" हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. 'स्वदेशी आंदोलन' हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै. *राजिव दीक्षित* यांचा हा *यशस्वी न्यायालयीन लढा* आहे.

(एक मुसलमान कसाई महंमद कुरेशी ह्याच्या विरुद्ध राजीव दीक्षित ह्यांनी गोहत्येच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातील जिंकलेल्या दाव्याची ही माहिती तुम्हाला उद्बोधक वाटेल. – प्रा० मनोहर राईलकर)

आपल्या देशाच्या शेतीच्या दृष्टीनं, जमिनीचा कस सुधारण्याकरता, राष्ट्रीय इंधनाची बचत करण्याकरता, प्रदूषण कमी करण्याकरता, स्वस्त औषधांकरता, अशा विविध कामाकरता गोवधबंदी आवश्यक आहे. त्या मागणीचा हिंदु किंवा मुसलमान धर्मांशी काडीचाही संबंध नाही.

पण, हिंदूंच्या गटाकडून आलेली मागणी म्हणजे ती जातीय तरी असणार, नाही तर अंधश्रद्धेवर आधारित असणार, नाही तर तिच्या मागं काही तरी छुपा राजकीय कार्यक्रम असणार, अशी आवई उठवायची.

आणि उलटसुलट वेडीवाकडी चर्चा घडवून गोंधळ उत्पन्न करायचा अशी प्रथा गेली काही वर्षं आपल्या राजकारण्यांनी पाडली आहे. 
*If you can’t convince, confuse.*

'लोकांना पटवून देता येत नसेल तर त्यांच्या मनात विचारांचा गोंधळ उडवून द्या.'

*मला त्यातल्या राजकारणाशी काडीचंही कर्तव्य नाही*.

पण, . राजीव दीक्षित यांच्यासारख्या एका अभियंत्यांनी तो कसा आणि कोणत्या आधारांवर लढवून अंती जिंकला, हे आपल्याला माहीत झालं तर बरीच अज्ञात किंवा दडवून ठेवलेली वस्तुस्थिती तुम्हालाही कळेल असं मात्र, निश्चितपणं वाटलं.

हा लेख प्रथम गाय और गाँवच्या नोव्हेंबर २००३ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.

कै.श्री. राजीव दीक्षित इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार (Telecommunication), आणि उपग्रहसंचार (Satellite communication), अशा तीन विषयांतील अभियंता होते.

यू-ट्यूबवर त्यांची विविध भाषणं ऐकता येतील.

त्यांनी प्रस्तुत *दावा कसा जिंकला हे समजून घेणं बोधप्रद* ठरेल.

काही प्राथमिक माहिती: ज्यांना गाय कापण्याचा परवाना आहे, असे *भारतात ३,६०० कत्तलखाने आहेत. त्यापलीकडे आणखी ३६,००० कत्तलखाने अवैधरीत्या चालवले जात असतात*. (हे आकडे जुने आहे. यांत आता बरीच वाढ झाली आहे.)

ह्या सर्वांतून *प्रतिवर्षी सरासरीने अडीच कोटी गाईंची कत्तल केली जाते*.

ते सहन न झाल्याने दीक्षित व त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी १९९८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

वर्धा येथील अखिल भारतीय गोसेवक संघ व अहिंसा आर्मी ट्रस्ट ह्या संस्थांनी हा दावा दाखल केला होता. नंतर त्यात गुजरात सरकारही सहभागी झाले.

१-२ न्यायाधीशांसमोर चालवण्याइतका प्रस्तुत प्रश्न किरकोळ अथवा सामान्य नसल्यामुळे तो खंडपीठासमोर चालवावा असा दीक्षितांचा आग्रह होता. त्याला तीनचार वर्षे न्यायालयाने मान्यता दिली नव्हती. आणि नंतर मान्यता दिली. आणि सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी ह्यांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायाधीशांचे घटनापीठ (कॉन्स्टिट्यूशनल) बनवण्यात आले.

*कसायांच्या बाजूने दावा लढवण्याकरता लक्षावधींचं शुल्क घेणारे नामवंत अधिवक्ते उभे होते.*,

*सोली सोराबजी ₹२० लक्ष,*
*कपिल सिब्बल ₹२२ लक्ष*
*महेश जेठमलानी (राम  जेठमलानींचे पुत्र) ₹३२ ते ३४ लक्ष*. हे कसायांच्या बाजूने उभे होते.

राजीव दीक्षितांच्या बाजूने दावा लढवण्याकरता एकही मोठा अधिवक्ता नव्हता.

 कारण त्यांचे शुल्क देण्याइतका पैसा त्यांच्याकडे नव्हता.

दीक्षितांनी न्यायाधीशांना विचारले, “आमच्याकडे कोणीही अधिवक्ता नाही, आम्ही काय करावे ते सांगावे.”
न्यायाधीशांनी विचारले,
“आम्ही आपल्याला अधिवक्ता पुरवला तर?” दीक्षित म्हणाले, “मोठेच उपकार होतील.”
त्याप्रमाणे न्यायालयाने मान्यता दिली आणि दाव्याला सुरुवात झाली.

गाय कापण्याबद्दल कसायांनी जे प्रतिपादन केले ते सर्व विचार पूर्वी शरद पवारांनीही मांडले होते. ते काही विद्याविभूषितांद्वारे आणि पं. नेहरूंद्वारेही सांगण्यात आले होते.

कसायांचे दावे :
(१) *गाय जेव्हा म्हातारी होते, तेव्हा तिला जिवंत ठेवण्यात काही लाभ नसतो. तिला कापून विकणे हे सर्वांत उत्तम. त्यातून आम्ही भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याला सहकार्यच करतो. कारण. आम्ही गोमांस निर्यात* करतो.

(२) भारतात चाऱ्याची कमतरता आहे. त्यामुळे त्यांना मारून विकणे हेच सर्वांत लाभदायक होय.

(३) भारतात लोकांना राहायला जागा नाही. तर गायींना कुठे ठेवणार?

(४) *गायींमुळं परकीय चलनही मिळते*.

(५) कसायांनी केलेला सर्वांत भयानक दावा असा होता, “गायीची हत्या करावी, असे आमच्या इस्लाम धर्मात सांगितले आहे.”

दीक्षितांनी शांतपणे, धैर्याने व अत्यंत तर्कशुद्ध रीतीने त्यांचे दावे कसे खोडून काढले, ते जाणून घ्यावे.

आपण आर्थिक दृष्टीनं विचार करीत आहोत. तेव्हा शक्य असल्यास मधून मधून काही टिपणं केली तर तुम्हाला नेमकी कल्पना येईल.

त्यांचा पहिला दावा होता गायीचे मांस विकल्यावर पैसे मिळतात.

दीक्षितांनी सर्व आकडेवारी न्यायालयापुढं ठेवली. एका सुदृढ गायीचे वजन तीनसाडेतीन क्विंटल असते. पण, ती कापल्यावर केवळ ७० किलोच मांस मिळते. एक किलो गोमांस जेव्हा निर्यात होते, तेव्हा ५० डालर    मिळतात म्हणजे रु. ३,५००. रक्त २५ लीटर, त्याचे १,५०० ते २,००० आणि हाडांचे १,००० ते १,२०० रुपये मिळतात. म्हणजे गाय मारून तिचे मांस, रक्त आणि हाडे विकून हत्या करणाऱ्या कसायाला अधिकतम केवळ ७,००० रुपयेच मिळतील. (आणि हे आकडे सुदृढ गायींच्या संबंधातले आहेत. म्हाताऱ्या गायींपासून इतकं उत्पन्न मिळत नाही.) पण, तिला जिवंत ठेवलं तर किती रुपये मिळतील? आता त्याची आकडेवारी पाहा….

एक गाय दिवसाला १० किलो शेण व ३ लीटर गोमूत्र देते. १ किलो शेणापासून ३३ किलो खत होते. त्याला सेंद्रिय खत म्हणतात. न्यायाधीशांना आश्चर्याने विचारले, “हे कसे शक्य आहे?”

त्यावर दीक्षित म्हणाले, “आम्हाला वेळ द्या आणि जागा द्या. आम्ही हे सिद्ध करून दाखवतो.” न्यायालयाने अनुमती दिल्यावर दीक्षितांनी आपलं म्हणणं सिद्ध करून दाखवलं.

ते न्यायाधीशांना म्हणाले, “आता आय.आर.सी. च्या संशोधकांना पाचारण करून शेणाचं परीक्षण करून घ्या.”

जेव्हा शेण संशोधनाकरता पाठवले, तेव्हा संशोधकांनी सांगितले,

“ह्यात १८ प्रकारची पोषक सूक्ष्मतत्त्वे (micro nutrients) आहेत. त्या सर्वांचीच सर्व शेतजमिनींना अत्यंत आवश्यकता असते. उदा. *मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, कोबाल्ट, सिलिकॉन, इत्यादी.” ह्याउलट रासायनिक खतांत केवळ तीनच पोषक तत्त्वे असू शकतात. याचा अर्थ शेणखत रासायनिक खताच्या सहापट शक्तिशाली आहे*. न्यायालयाने ते मान्य केले.

दीक्षित म्हणाले, “माझे वडील आणि दोघे भाऊ शेतकरी आहेत. १५ वर्षांपासून आम्ही गायीच्या शेणापासून खत करून शेती करतो. *१ किलो शेणापासून ३३ किलो खत बनते. रोजच्या १० किलो शेणापासून ३३० किलो. (म्हणजे महिन्याचे १ टन) आणि ६ रुपये किलोप्रमाणे १८०० ते १९०० रुपयांचे खत प्रतिदिन मिळेल. म्हणजे वर्षाचे रु. ७०,०००च्या वर* झाले.

 *गायीचे आयुष्य २० वर्षांचे मानले तर एक गाय आयुष्यात एक कोटी ४० लक्षांच्यावर उत्पन्न देते*. विशेष म्हणजे ती मृत्यूपर्यंत, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शेण देत राहते.”

सहस्रो वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रांत लिहून ठेवले आहे की गायीच्या शेणात लक्ष्मी आहे.
आधुनिक शिक्षण घेतलेल्या मेकॉलेच्या मानसपुत्रांनी ह्या गोष्टीची टवाळी केली. त्यांना धर्म, संस्कृती, सभ्यता सर्व थोतांड वाटते. पण गायीच्या शेणात लक्ष्मी असते, हे तर वरच्या आकडेमोडीनं सिद्धच झाले आहे. त्याच्या उपयोगानं धान्य निर्माण होते. संपूर्ण भारताचे पोट त्यातून भरते.

आता गोमूत्राचा विचार करू. दिवसाला दोन ते तीन लीटर गोमूत्र मिळते. *गोमूत्रापासून ४८ प्रकारच्या रोगांवर औषध बनते*.

*एक लीटर गोमूत्र औषध रूपात विकले तर त्याची किंमत रु. ५०० होते. भारतीय बाजारपेठेत, आंतरराष्ट्रीय बाजारात ह्यापेक्षा अधिक भाव* मिळतो.

*अमेरिका भारतातून गोमूत्र आयात करते आणि त्यापासून मधुमेहावर औषध बनवते.*

अमेरिकेत गोमूत्राची तीन पेटंटे आहेत.

अमेरिकन बाजारपेठेच्या हिशेबाने आकडेमोड केली तर त्याचा *दर लीटरला डॉ. १२००, ते १३०० आहे. याचा अर्थ एका गायीपासून  प्रतिवर्षी ११,००.००० (११ लक्ष) रुपये मिळतात. म्हणजे २० वर्षांच्या आयुष्यात २,२०,००,००० (दोन कोटी वीस लक्ष रुपये)* झाले.

पुन्हा गायीच्या शेणापासून मिथेन गॅस बनतो. आपल्या घरगुती सिलिंडरांत तोच असतो. आणि जशी एलपीजीवर चारचाकी गाडी चालू शकते, तशी ह्या गॅसवरही चालू शकते.

न्यायाधीशांचा त्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दीक्षित म्हणाले, “आपल्या गाडीला आम्ही शेणापासून बनवलेल्या मिथेनचा सिलिंडर बसवून देतो. आपण गाडी चालवूनच पाहा ना.” त्यांनी मान्यता दिली. आणि तीन महिने गाडी चालवली. आणि म्हणाले, "एक्सलंट!!"

कारण, त्यांना *प्रतिकिलोमीटर केवळ ५० ते ६० पैसे इतकाच खर्च* पडला. आणि डिझेलला प्रति किलोमीटर ४ रुपये खर्च (म्हणजे सातपट) येतो.

आणखी, *मिथेनवर चालणाऱ्या गाडीचा धूर नाही*, वातावरणात शिसे पसरत नाही, आवाजही कमी होतो. ह्या सगळ्याच बाबी न्यायाधीशमहाराजांच्या लक्षात आल्या. मग दीक्षित म्हणाले, *“प्रतिदिन १० किलो शेणापासून २० वर्षांत किती गॅस मिळेल?”*

*भारतात १७ कोटी गाई आहेत. त्यांचे शेण एकत्र केले तर देशाची १ लाख ३२ सहस्र कोटींची बचत होईल. आणि थेंबभरसुद्धा, डिझेल किंवा पेट्रोल आयात केल्याविना देशाची संपूर्ण वाहतूक होऊ शकेल*. तीही सातव्या हिश्श्यानं स्वस्त. अरब देशांसमोर हात पसरायची आवश्यकताच राहणार नाही, की अमेरिकी डॉलर देऊन पेट्रोल विकत घ्यावं लागणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं मूल्य वाढेल.

ही सगळी आकडेवारी जेव्हा दीक्षितांनी न्यायाधीशांसमोर मांडली, तेव्हा, गायीची हत्या करण्यापेक्षा तिला वाचवण्याने देशाचा आर्थिक लाभ अधिक आहे, हे त्यांनी मान्य केले.

न्यायालयाचे हे मत जेव्हा कसायांना समजले, तेव्हा ते संतापले. आपला पराभव त्यांना डोळ्यांसमोर दिसू लागला.

*गोहत्येपासून ७० सहस्र रुपयांचा लाभ होतो, असे ते म्हणाले होते. पण तिची हत्या केली नाही, तर तिच्यापासून कोट्यवधी रुपयांचा लाभ होतो*. आणि आजवर हे कुणी सांगितलंसुद्धा नव्हतं. तर पटवून सिद्ध करण्याची गोष्टच उद्भवली नाही.

(आणि गायींची पैदास वाढवली तर आपण गॅस निर्यातही करू शकू. इंधनाची समस्या उरणारच नाही. वर आपल्या बाळांना अधिकाधिक दूध देऊ शकू.)

मग कसायांनी आपला हुकमाचा एक्का बाहेर काढला. ते म्हणाले, *गोहत्या करणे हा आमचा धार्मिक अधिकार आहे.*

त्यावर दीक्षित म्हणाले, “त्याकरता *कुराण, शरियत, हदीस हे सगळे ग्रंथ आम्ही न्यायालयासमोर आणतो. गाईची कत्तल करा असे त्यात कोठे लिहिले आहे, ते आम्हालाही जाणून घ्यायाचे आहेच. गायींची हत्या करा, असे त्यात कुठेही लिहिलेले नाही*, असे आपल्या लक्षात येईल.

उलट, *'गायीचे रक्षण करा!' असेच हदीसमध्ये म्हटले आहे, कारण तीही तुमचे रक्षण करते*. गाय मुका प्राणी आहे, म्हणून तिच्यावर दया करा, असेच महमद पैगंबर ह्यांचे विधान आहे.

गायीची हत्या कराल तर दोझकमध्येसुद्धा जागा मिळणार नाही, जहान्नमध्येही जागा मिळणार नाही, असेही आणखी एके ठिकाणी म्हटले आहे.

तर मग गायीची हत्या करण्याचा अधिकार त्यांना केव्हापासून मिळाला? विचारा ह्या कसायांना.”

तेव्हा कसाई निरुत्तर झाले.

दीक्षित पुढे म्हणाले, “मक्का, मदीनामध्ये काही ग्रंथ असतील तर तेही घेऊन या.”

मग न्यायालयाने एक महिन्याची मुदत दिली. आणि गायीची हत्या करणे हा इस्लामचा मूलभूत अधिकार आहे, असा आदेश असलेले असे काही दस्तऐवज असतील तर घेऊन येण्याचा आदेश दिला.

एक महिन्यात काहीही पुरावा मिळाला नाही. आता आणखी वेळ देता येत नाही, असे म्हणून *न्यायालयाने २६ ऑक्टोबर २००५ ला (बरोबर १० वर्षांपूर्वी) आपला निर्णय दिला*.



ह्या निर्णयाची प्रत *आपल्याला www.supremecourtcaselaw.com ह्या दुव्यावर जाऊन पाहता* येईल.

हे *निकालपत्र ६६ पानी आहे*. तो निर्णय देऊन न्यायालयाने इतिहास घडवला आहे.

*निर्णयात न्यायालय म्हणते, गायीची हत्या हा संवैधानिक अपराध आहे, धार्मिक पाप आहे*. गोरक्षण, गोसंवर्धन करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. सरकारचे आहेच. पण नागरिकांचेही आहे.

आजपर्यंत जी संवैधानिक कर्तव्ये होती (उदा. राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे, क्रांतिकारकांचा आदर करणे, देशाची अखंडता व एकता अबाधित ठेवणे), *आता गायीचे रक्षण ह्याचीसुद्धा संवैधानिक कर्तव्यांमध्ये भर घातली गेली आहे*.

1998 च्या भारतच्या अणुस्फोटानंतर जगाने भारतावर आर्थिक बंदी लादली. पण भारतावर त्याचा फारसा दुष्परिणाम झाला नाही.  अमेरिकेने याचा विशेष अभ्यास केला व भारताची बलस्थाने हेरली व ती नष्ट करण्याचा विशेष कार्यक्रम मोठया बजेटसह आखला.
भारताची 1. पारम्पारिक शेती, 2 . कुटुंब व्यवस्था 3. भारतीय नीतिमूल्ये या तीन गोष्टी नष्ट केल्याशिवाय भारत कधीच पुरता सम्पणार नाही. गोधन सम्पवणे, भारतीय बियाणी सम्पविणे, तथाकथित विचारवंत, मीडिया मार्फत कुटुंब व्यवस्था नितिमूल्ये सम्पविणे हा योजनापूर्वक कार्यक्रम सुरु आहे. गाईंची कत्तल हां त्यातला एक भाग.

*हे फार मोठे षड्यंत्र आहे*.
*सर्वानी समजून घेतले तरच निभाव लागेल*.

*जास्तीजास्त लोकांपर्यत पोहचवा.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳*

कोई टिप्पणी नहीं: