मधुमेह- नियंत्रण व आयुर्वेद
आपण जसे जसे सुख सुविधांनी संपन्न जीवन जगु लागलो आहोत, त्या प्रमाणात काही व्याधी मणुष्यात निर्माण होत आहेत, सध्याच्या गतिमान व धकाधकीच्या जीवन शैलीमुळे मधुमेह हा व्याधी आपल्यातीलच एक अविभाज्य घटक होउन राहिलेला आहे. मधुमेह चोर पावलांनी शरीरात प्रवेश करतो. मधुमेह झालेले लक्षात येत नाही आणि लक्षात येतं तेव्हा त्याने शरीरात चांगलेच हातपाय पसरलेले असतात. ब-याच वेळा त्याचा कोणताही त्रास जाणवत नाही पण शरीर मात्र आत मधून पोखरणे सुरु असते.
मधूमेहाची लक्षणे खालील प्रमाणे असू शकतात.
जास्त तहान लागणे.
सारखी लघवीला येणे.
जास्त भूक लागणे किंवा थकवा जाणवणे.
कोणतेही प्रयत्न न करता वजन कमी होणे.
जखम झाल्यास ती बरी होण्यास वेळ लागणे.
कोरडया त्वचेत खाज येणे.
पाय सुन्न पडणे किंवा याला मुंग्या येणे.
नजर अस्पष्ट होणे.
अशा प्रकारची लक्षणे जर आढळ्त असतील तर साध्या रक्ताच्या चाचणीद्वारे मधुमेहाचे निदान होउ शकते. मधुमेहाचं निदान झालं की, पुढील संभाव्य धोके टाळण्यासाठी तो नियंत्रित ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी योग्य आहार, विहार, व्यायाम महत्त्वाचा आहे. यासाठी योग्य मार्गदर्शन व नियमित रक्तातील साखरेची पातळी तपासणीसुद्धा गरजेचं आहे.
मधुमेहामध्ये आहार व व्यायामाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आहाराचं योग्य प्रमाण, पौष्टिकता आणि जेवणाच्या वेळा पाळणं महत्त्वाचं असतं. योग्य मात्रा व योग्य प्रमाणात आहार व शरिराच्या प्रकृतीनुसार आहार घेतल्यास वजनवाढ रोखली जाते.
दैनंदिन आहारामध्ये शरीराला आवश्यक असलेली पौष्टिकता, स्निग्धता, कार्बोदके, प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि तंतुमय पदार्थ (चोथा) यांचं योग्य प्रमाण असावे लागते. मधुमेहामध्ये आहारातील चोथ्याला जास्त महत्त्वं आहे. कारण चोथ्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहायला मदत होते, आहाराची पचन क्रिया व्यवस्थित राहते.
मधुमेही रुग्णाचे वाढलेले वजन कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदिक औषधांच्या मदतीने वजन कमी करणे अत्यंत सोपे आहे. फक्त जाहीरातीच्या भुल थापांना बळी पडु नये.
आहारातील तोचतोचपणा टाळण्यासाठी आहाराच्या विविध पर्यायांचा विचार करावा. सर्वसाधारणपणे मधुमेहींना भूक सहन होत नाही. वरचेवर भूक लागल्याने ते खात सुटतात आणि वजनवाढीला बळी पडतात. म्हणूनच त्यांना नेमून दिलेल्या उष्मांकाचं अन्न दिवसभरात सहा ते सात वेळांत विभागून त्या-त्या वेळेस खाणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीर तृप्त राहतं. भूक लागल्यावर गाजर, काकडी, ताजे ताक, चुरमुरे भरपूर प्रमाणात खावी. परिणामी थकल्यासारखं वाटणं, चिडचिडणं हे त्रास उद्भवत नाहीत. शिवाय नियंत्रित उष्मांक शरीरात जात असल्याने वजनवाढीचं भयसुद्धा राहत नाही.
मधुमेहींनी आहारात काही निवडक पदार्थ वर्ज्य केले, तर त्यांचं जगणं सुसह्य व्हायला खूप मदत होईल.
साखरयुक्त मिठाई,
आइस्क्रीम,
कँडी, केक, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, मांसाहार
चॉकलेट इत्यादी पदार्थ टाळणं अत्यंत आवयक आहे.
त्याचप्रमाणे पिष्टमय पदार्थ असलेले बटाटे, रताळी इत्यादी पदार्थ, तळलेले पदार्थ, पनीर, चीज, खवा, लोणी मधुमेहींनी शक्यतो टाळावीच.
गोड फळं उदा. आंबा, केळी, चिकू, द्राक्षं इत्यादी फळंसुद्धा टाळणं गरजेचं आहे. त्याऐवजी संत्र, मोसंब, पेर, पपया, सफरचंद, आवळा, जांभूळ , कलिंगड ही फळं थोड्या प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावीत.
पालेभाज्या, वेलभाज्या खाव्यात. शेवग्याच्या शेंगा, चवळीच्या शेंगा खाल्लेल्या चांगल्या.
आहारात नाचणी, मूग, हुलगे, हरबरा, जुने तांदूळ, कारले, दोडका, दूधीभोपळा यासारख्या भाज्या पथ्यकर आहेत.
चपाती, भाकरीचं पीठ कोंडायुक्त असेल याकडे कटाक्ष ठेवावा.
म्हशीच्या दुधाऐवजी गाईचं दूध वापरावं. त्याचंच दही, ताक खावं.
तेलाचा वापर फक्त फोडणीसाठी करावा. एरवी शक्यतो भाजणं, उकडणं, वाफवणं यावरच भर द्यावा.
दररोज न चुकता व्यायाम करणे सगळयात चांगले .चालणं हा उत्कृष्ट व्यायाम आहे. रोज 1 तास जलद चालण्याचा व्यायाम न चुकवता वेळ मिळेल त्या वेळी करावा. तो घरातल्या घरात, रस्त्यावर, बाग बगिच्यामध्ये, ट्रेड मिलवर कुठेही चालेल. रोज किमान ४ ते ५ कि.मी. चालावं. वजन कमी करण्यासाठी जास्त चालणं आधिक उपयोगी. मात्र त्यामध्ये प्रामाणिकपणा असावयास हवा. कोणतीही गोष्ट सातत्याने केल्यास लवकर फळास येते. चालण्याची सवय असायला पाहिजे, योग्य मार्गदर्शनाखाली योगासने करावी. नित्य बसून राहणे, दिवसा झोपणे, सकाळी उशीरा उटणे, व्यायाम न करणे या गोष्टी टाळाव्यात.
ताण तणाव रहीत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा. शवासन, ध्यान धारणा, प्रार्थना, संगीत, आर्ट ऑफ लिव्हिंग, आयुर्वेदातील शिरोधारा, स्नेहन-अभ्यंग याचा उपयोग करुन घेतल्याने तणाव रहीत आयुष्य जगणे सोपे जाते.
आयुर्वेदातील जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक घोटभर कोमट पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते.
मधूमेह या आयुष्यभर साथ करणारया आजाराला नियंत्रणात ठेवायचे असल्यास आद्रक खा, असा सल्ला ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी दिला आहे. आल्यामुळे रक्तातील साखर आरामात नियंत्रणात राहते. याचा फायदा दीर्घकाळापर्यंत मधुमेहाच्या रुग्णांना मिळू शकतो
कडूलिंब, कारले, सप्तपर्णी, नागरमोथा, खदिर, लोध्र, गुळवेल, वड, उंबर, जांभूळ, बेल, आवळा, त्रिफला, गुडमार इत्यादी वनस्पती द्रव्ये रक्तातील साखर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच मधुमेहामध्ये वेगवेगळ्या धातूंच्या भस्मांचाही उपयोग करता येतो. उदा. वंग, नाग, जसद, लोह, रोप्य, सुवर्ण ,शिलाजित याचा सर्व प्रकारच्या प्रमेहात उत्तम उपयोग होतो. वरील सर्व चिकित्सा देत असताना या सर्व औषधांनी मधूमेह कमी होतो, हे खरे पण त्याचा परिणाम सर्व शरीरावर होण्यास काही अवधी जरूर द्यावा लागतो. प्रमेह काही रूग्णात पूर्ण बरा झाला असे दिसून येते. मात्र यासाठी आवश्यक ती चिकाटी व योग्य औषधोपचार अनेक दिवस चालू ठेवणे जरूरीचे असते. आयुर्वेदीय चिकित्सेने रक्तशर्करेचे प्रमाण अचानक एकदम कमी झाले असे कधीच घडत नसल्याने ही औषधे सुरक्षित व सहजतेने वापरता येतात. मधुमेही रुग्णांनी शरिर शुध्दिकरणासाठी आयुर्वेदातील पंचकर्मे करुन घ्यावीत. यातील स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती या पंचकर्मांचा चांगला फायदा होत असताना दिसुन येते.
प्रत्येक मधुमेहीचा आहार, त्याचं वजन, मधुमेहाची तीव्रता आणि इतर शारीरिक आजार इत्यादी गोष्टींनुसार वेगळा असतो. त्यामुळे एक दुस-याचं अनुकरण करू नये. कोणतेही औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा. आधुनिक औषधाबरोबर आयुर्वेदिक औषधी घेतल्यामुळे मधुमेहातील भविष्यात होणारे दुष्परीणाम टाळ्ता येतात. लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालयात मागील कित्येक वर्षापासुन रुग्ण आधुनिक औषधाशिवाय आयुर्वेदिक औषधीच्या मदतीने आरामात मधुमेहासोबत जीवन जगत आहेत.
डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पद्मा नगर, बार्शी रोड, लातुर
०२३८२ २२१३६४
शुक्रवार, 15 नवंबर 2013
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें