https://youtu.be/msjJ1sGgnnw -- अथर्वशीर्ष (लीमे)
आगळी-वेगळी माहिती ;-
सत्र ;- १०२
🌰 रुद्राक्ष कुठे सापडतो ? त्याचा अस्सलपणा कसा ओळखावा ? 🌰
रुद्राक्ष हे " एपिलो कार्पस गॕनितट्रस " या झाडाचे फळ आहे. या झाडाच्या अत्तापर्यंत ३६ जाती आढळल्या आहेत. पिकलेल्या फळाचा वरचा गर काढून टाकला की आतमध्ये 'रुद्राक्ष मणी ' मिळतो. आज बरेच ठिकाणी रुद्राक्ष आधुनिक साधनांनी स्वच्छ केले जातात. याची सुरुवात नेपाळ ने केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❇ रुद्राक्षांची झाडे कुठे आढळतात ?
ही झाडे ब्रम्हदेश , भूतान , इंडोनेशिया , नेपाळ , भारतातील ;- आसाम , बंगाल , हरिद्वार , रामेश्वरम , नाशिक इत्यादी प्रदेशांत आढळतात. हे फळ समुद्रसपाटीपासून जास्तीतजास्त तीन हजार मीटर उंचीवर सापडते. रुद्राक्षाची झाडे कपारीत वाढतात , सपाटीत वाढत नाहीत. याच्या झाडाची पाने चिंचेच्या व गुंजेच्या पानासारखी पण अधिक लांब असतात. त्याला वर्षाला एक ते दोन सहस्त्र फळे लागतात. हिमालयातील यती केवळ रुद्राक्षफळ खातात. याला अमृतफळ असेही म्हणतात. ते खाल्ल्यास तहान लागत नाही.
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
☣ नेपाळमधील रुद्राक्ष सर्वोत्तम का मानला जातो. ?
यांना हवे ते तापमान समुद्रसपाटीपासून २४६० मीटर उंचीवर म्हणजे नेपाळच्या पशुपतिनाथाच्या भुमीत आढळते. आकाराने समान , गुळगुळीत ,टणक , मोठे ,पूर्ण गोलाकार , निकोप, आणि नैसर्गिक छिद्र असलेले रुद्राक्ष उत्तम सांगितले आहे आणि असेच रुद्राक्ष नेपाळच्या भूमिवर उगवतात.
हिमालय हा महादेवाचा प्रांत आहे . कैलास आणि त्यापलीकडे नेपाळच्या तराई वनामध्ये रुद्राक्षाची वने आहेत. आज ती अगदी दुर्गम भागात आहेत. तिथे पोहोचणे दुरापास्त आहे. आज नेपाळमध्ये बरेच नवीन ठिकाणी रुद्राक्षाची शेती केली जाते. इथले रुद्राक्ष टणक , मजबूत , अत्यंत मनोहारी आणि सुलक्षणी असतात. वेगवेगळ्या प्रदेशातील रुद्राक्ष मणी दिसायला वेगवेगळे असता, पण साम्य आढळले तरी प्रत्येक मण्याची शक्ती वेगळी असते.
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
✴ केदारनाथ परिसरातील रुद्राक्ष ;-
येथे रुद्राक्षाचा वृक्ष मध्यम उंचीचा आढळून येतो. इथे उगवतात तशीच झाडे भूतान मध्येही उगवतात. यांचे कवच खेचून जोरात काढावे लागते कारण ते फार सहज निघत नाही. मग ते काढल्यावर रुद्राक्षाला अंगचे भोक असते ,पण ते अतीशय नीट साफ करून घ्यावे लागते. आत अडकलेल्या काड्या वगैरे काढाव्या लागतात. पारंपारिक पद्धतीने येशे शेकडो वर्षांपासून असेच रुद्राक्ष काढले जातात.
➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰
🕎🔆💢 रुद्राक्ष परीक्षा 💢🔆🕎
🔅१) पूर्णपणे पिकलेले रुद्राक्ष कुठल्याही आकाराचे असले तरी पाण्यात टाकल्यावर बुडते. पाण्यामध्ये चटकन बुडणारे रुद्राक्ष हे अस्सल आहे याची खात्री बाळगायला हरकत नाही. जे पाण्यात डुंबत बुडेल ते जरा हलक्या दर्ज्याचे समजावे.
🔅२) रुद्राक्ष हे पाच- दहा मिनिटे तळहातात घट्ट दाबून धरले आणि नंतर हलवले तर त्यातून मंजुळ ध्वनी प्रतीत होतो.
🔅३) तांब्याच्या दोन भांड्यात वा तांब्याच्या पसरट ताटांत रुद्राक्ष ठेवले असता अस्सल रुद्राक्ष लगेच हालचाल दर्शवतो.
🔅४) खरा रुद्राक्ष जसा तरंगत नाही तसा उकळत्या पाण्यात जर ६-८ तास ठेवला तरी त्याचे विघटन होत नाही, तसेच रुद्राक्ष हे कुठल्याही बाजूने मोडत अथवा वाकत नाही.
🔅५) अस्सल रुद्राक्ष बराच वेळ दुधात ठेवल्यास दूध नासत नाही.
🔅६) रुद्राक्ष हा प्रामुख्याने गोल असतो. तो दिसायला काटेरी , पण ते काटे बोथट असतात, खडबडीत असतात , त्याचे काठिण्य भरपूर असते. रुद्राक्ष दबला जात नाही. संकलन- अभिजीत कुलकर्णी.
बुधवार, 11 नवंबर 2015
सदस्यता लें
संदेश (Atom)