सोमवार, 25 जून 2018

*रानभाज्या* --m डॉ प्र के घाणेकर

*रानभाज्या*
वक्ते : *डॉ प्र के घाणेकर*
निसर्गसेवक व जीविधा यांच्या तर्फे व्याख्यान
21 जुन 2018

पूर्वी लोकांना हे ज्ञान झाले की आपण एखादे झाड लावले तर त्याला तशाच प्रकारची फळं येतात. 

केनीकोमेलीना किंवा गुलबक्षी ची भजी खूप छान लागतातपण पावसाळ्याच्या सुरवातीला च करायची.

हे ज्ञान पिढ्यानपिढ्या आपल्याकडे आहे,ते हरवत चालले आहे

हिमालयात सांगला valley मधे जिभी च्या फळांचे सरबत मी पेयले. त्याच्या लाल रंगांच्या पाकळ्यांचे सरबत करतात.

हिपोपे : घोड्याच्या खाण्यात जर ही फळं आली तर घोडे मरतात. हिपोपे च्या फळात व्हिटॅमिन खूप प्रमाणात असतेते DRDO ने विकसित केले आहे.

मोहाच्या बियांचे तेल वापरले जाते.

जीबीला आम्ही एक नेचे टेरिबीलम aqurium गोळा केले ,त्याची भाजी तेथील लोकांनी केली होती
तेच नेचे मदुमलाई च्या जंगलात पण मिळते ,तेथील बाई ने पण तशीच भाजी केली होती

म्हणजे ह्या सगळ्या लोकांना काय करायचे,कसे करायचे ते सगळं कळतं.

गढवाल भागात फापडा चे पीठ मिळतेते वर्षभर टिकतेह्या लोकांना ते कसं टिकवायचे ते पण माहिती असते ह्याच्या नुसत्या बिया ठेवल्या तर टिकत नाहीपण पीठ करून ठेवले तर टिकतेहे सगळं ह्या लोकांना माहिती असते.

मेक्सिको च्या काही भागात लक्षात आले की डायबेटिस ची औषधे अजिबात खपत नाहीतमग research केल्यावर लक्षात आले की तेथील जलाशयात पाण्यात स्पिरुलिना नावाची एक वनस्पती आढळते त्यात खूप औषधी गुणधर्म आहेत

लोणफळ आजकाल पंचतारांकित हॉटेल मधे पण मिळते.

आफ्रिकेत निग्रेटो जमात आहे ते आजही दिगंबर अवस्थेत रहातातकिंवा अगदी ग्रामीण भागात जे रहातातपण त्यांना रानात काय उगवतंकसं खायचं ते त्यांना माहिती आहे.ते त्यावर अनेक महिने काढू शकतात.

मी राजगड ला गेलो होतोतेथील एका माणसाने खाज खोवली च्या बियांची भाजी दिलीअप्रतिम होती.

त्याने मला सांगितले की चुलीमधील एक दगड घ्या आणि तो चघळा. मी तसे केले तर मला खूप पोट भरल्याचे feeling आले. असं होतंत्यांना हे माहिती आहे

हरिहरेश्वर ला सागरी शेवळ्याचे पापुद्रे होतेत्याची आम्ही भजी केली होतीती इतकी चवदार होतीत्याचे नाव अल्वा.

पण मी आता सांगणार नाही कारण आता तिथे प्रचंड प्रदूषण समुद्रात झाले आहे

मला विचारले की फळांचा राजा कोण तर मी सांगतो ताडगोळा. हे रान फळ आहे,  ताड गोळ्याची मुद्दाम कोणीही लागवड करत नाहीतखूप उंचावर लागतो.

ज्याला ताड गोळ्याची माहिती आहे तो छोटे छोटे ताड गोळे निवडतो. ते कोवळे छान लागतात. काय खायचंकेंव्हा खायचं ते ह्या लोकांना माहिती असते.

आंजरले ला साठ्ये म्हणून एक आहेत त्यांच्याकडे छान जेवण असते त्यांच्या कडे आमसूला सारखे एक फळ असते त्याची आमटी करतात,अतिशय चवदार लागते.

ओंट म्हणून फळ आहेआमसुलं रातां ब्या च्या जातीतील हे झाड आहेत्याची आमटी खूप छान लागते.

लाख पेक्षा जास्त वनस्पती खाण्याजोग्या आहेत पण 3000 वनस्पतीच आपल्याला माहिती आहेत.

कोलंबस मुळे आपल्याकडे बटाटे,रताळे वगैरे आल्या. 500 वर्षांपूर्वी आपल्याकडे आल्या.तोवर आपल्याकडे हे बटाटे,रताळे वगैरे मुख्य अन्न नव्हते. Colambean exchange म्हणजे इकडच्या वनस्पती तिकडे गेल्या आणि त्यांच्या वनस्पती आपल्याकडे आल्या.

धान्य आणि कड धान्य ह्यांचा कस कमी होऊ लागला आहे.

आदिवासीवनवासी लोकांना जे ज्ञान आहे त्याचं documentation करणे आवश्यक आहे.

पूर्वी कर्तुळीवाघाटी खायचे. जी बाई ते विकायला आणते  ती पूर्वी झोपडीच्या बाहेरूनच आणायची.  आता तिला डोंगरावर लांब जायला लागते. आणि पूर्वी ते घरी पण ते ठेवायचे आता सगळचं विकायला नेतात.

मी दासबोध वाचतो ,ते धार्मिक पुस्तक नाहीकसं जगावं हे सांगणारं पुस्तक आहे. त्यात अनेक प्रकारच्या आंब्यांचा उल्लेख आहे.

वेगवेगळ्या आंब्याचे जतन आपण केले पाहिजे.

वेगवेगळी वाण जी आहेत ती आपण घालवतो आहे

जुन्नर जवळ रानभाज्या महोत्सव चालतो.

रानभाज्या म्हणजे कडवट,तुरट असं नसतं.

रानभाज्या शेतात लावता येतील का ह्याचा विचार करायला पाहिजे.

रान भाज्यांचा प्रचार प्रसार करताना त्या मुळापासून  काढली जात नाहीत नाआणि पुढच्या वर्षी आपल्याला मिळतील ना ह्याचा पण विचार केला पाहिजे. ह्या  सर्व भाज्या organic च आहेत.  Food analysis करणाऱ्या मंडळींनी रान भाज्यांची therapeutic valueकाय आहे ह्याचा अभ्यास केला पाहिजे

आपला जुना ठेवा आपण हरवत चाललो आहोत

रान भाज्यांचे वर्ग घेतले पाहिजेत.

Barbeque च्या तोंडात मारेल अशी पोपटी म्हणून एक प्रकार आहे ,ती भन्नाट लागते.

कढण म्हणून एक प्रकार आहेते अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असते.

दरवर्षी पावसाळ्यात विविध रानभाज्या आपल्या आसपास उगवलेल्या आढळून येतात. या भाज्या चवीला रुचकर असतातचतसेच त्या पौष्टिक आणि औषधीसुद्धा असतात.  
.
टाकळा : 
टाकळा सहा पर्णीका असतात 
ही वनस्पती पावसाळ्यात उगवते व ऑक्टोवर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुले येतात. 
टाकळा ह्या वनस्पतीला उग्र वास किंवा दुर्गंधी असला तरी टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.
टाकळ्याच्या पानांची भाजी सर्व प्रकारच्या त्वचारोगात देतात तर त्याच्या बिया वाटून लेप त्वचेवर लावतात.
तसेच भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते.

आंबुशी : 
पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला आंबुशी ही नाजूक वनस्पती उगवलेली पाहावयास मिळते.
ही महाराष्ट्रात सर्वत्र आढळते.
आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. ही वनस्पती पचनास हलकी असूनभूक वाढीसाठी उपयुक्त आहे 
तसेच कफवात आणि मूळव्याध यात आंबुशी गुणकारी आहे

मायाळू : 
मायाळू ही बहुवर्षायू वेल असूनया वनस्पतीची बागेतअंगणातपरसात तसेच कुंडीत लागवड करतात.
मायाळूचे वेल कोेकणात सर्वत्र आढळतात. 
मायाळूची कोवळी पाने भाजीसाठी वापरतात. 
रक्ताची किंवा पित्ताची उष्णता अतिशय वाढल्यास मायाळूची भाजी देतात. 
गुणधर्माने ही भाजी थंड स्वरूपाची आहे.
मायाळूची भाजी पालकाप्रमाणे जिरण्यास हलकी आहे.

करटोली : 
करटोलीची वेल कोकणमराठवाडाविदर्भपश्‍चिम घाट व पश्‍चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात.
करटोलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात. 
करटोलीच्या फळांची भाजी कारल्यासारखीच असूनपावसाळ्याच्या अखेरीस ही भाजी बाजारात काही ठिकाणी येते. 
करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.

कपाळफोडी : 
ही वेलवर्गीय वनस्पती असूनपावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते. 
या वनस्पतीची वेल महाराष्ट्रातील जंगलेशेत आणि ग्रामीण भागात आढळते.
सांधेसुजीवर पंचांग पाण्यात किंवा दुधात वाटतात व लेप करतात. यामुळे ठणका कमी होतो व सूज उतरते.
कानदुखीत तसेच कानफुटीत कानात घालतात. यामुळे कानदुखी थांबते म्हणूनच या वनस्पतीला कानफुटी असेही नाव आहे.

शेवळा : 
शेवळा ही वर्षायूकंदवर्गीय वनस्पती आहे. 
महाराष्ट्रामध्ये शेवळा वनस्पती कोकणपश्‍चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते.
शेवळ्याचा कंद औषधात वापरतात. याच्या कंदाची पाने दूध आणि साखरेबरोबर वाजीकरणासाठी देतात.
शेवळ्याचे कंद व कोवळी पाने भाजीसाठी वापरतात.

मोरशेंड : 
ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती पावसाळ्यात सर्वत्र आढळते.
शेतातजंगल परिसरातरस्त्यांच्या कडेनेओसाड पडीक जमिनीवरगावांतगावाबाहेर सर्वत्र वाढलेली आढळते. 
मोरशेंड वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.
या भाजीच्या सेवनामुळे रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होऊन सांध्यांची सूज कमी होते.

नळीची भाजी : 
नळीची भाजी ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारीकाठांवरपाणथळओलसर जमिनीवरदलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते.
महाराष्ट्रात ही वनस्पती सर्वत्र आढळते. या वनस्पतीचे वेल जमिनीवर पसरत वाढतात. 
नागिणीच्या उपचारात ही वनस्पती वापरली जाते. तसेच कावीळश्‍वासनलिका दाह व यकृतविकारात या वनस्पतीचा वापर करतात.

आघाडा : 
आघाडा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असूनपावसाळ्यात जंगलातओसाडपडीक जमिनीवररस्त्यांच्या कडेनेशेतात सर्वत्र आढळते.
प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय प्रदेशात भारतातमहाराष्ट्रात सर्वत्र ही वनस्पती आढळते. 
या वनस्पतीची मुळेपानेफुलेफळे (पंचांग) औषधात वापरतात.
अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत.
जेवण्यापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतोतर जेवणानंतर दिल्यास आम्लता कमी होते.
रातांधळेपणात आघाड्याच्या मुळाचे चूर्ण देतात.

भुईआवळी : 
भुईआवळी ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, 20 ते 50 सें.मी.पर्यंत उंच वाढते. 
भुईआवळी ही वनस्पती "इफोरबिऐसीकुळातील म्हणजेच एरंडाच्या कुळातील आहे. 
याची पानेकोवळी खोडे व फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात.
फ्ल्यूसारख्या थंडी-तापाच्या आजाराततसेच वरचेवर सर्दी-खोकलाताप येणे अशा लक्षणांत ही भाजी नियमितपणे खावी.


एका झाडाला दोन फळं लागतात म्हणून एक बोटनिस्ट सांगत होता ह्या झाडाला म्हणे फळं लागतात एक कैरी आणि दुसरे आंबा. असे ज्ञान सध्या आजकालच्या या बोटॅनिस्ट्सना आहे. यांच्याकडुन आपण आपल्या या ठेव्याच्या माहितीची काय अपेक्षा ठेवणार?

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें