बुधवार, 1 सितंबर 2010

adi ला झाला बाऊ, म्हणून

adi, तू काल टेनिस-एल्बो झाल्याचं म्हणालास. आपण बोललो कि हे वातामुळे असून यावर उपाय फक्त एक - सूक्ष्म व्यायाम. मी तुला बोटांचे व मनगटाचे कांही व्यायाम पण सांगितले. आतां हे विचारांत घे.
वात शरीरांत सर्वत्र असतो, पण imbalance होऊ लागला की कुठेतरी स्वतःचं अस्तित्व दाखवतो, ते त्याने तुझ्या बाबतीत टेनिस-एल्बोच्या रूपाने दाखवले. पण सुधार हा शरीरभर integral way नेच होणार हे तुला पटतं का? आणि तसं पटलं तर तुला कळेल की फक्त बोटांचा व्यायाम न करता तू इतरही भागांचा करायला हवास. उदा. पायाच्या बोटांच्या कांही व्यायामाने शरीरभराचा वात balanced रहातो. किंवा प्राणायाम. विचार कर मग आपण बोलू.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें