रविवार, 17 अगस्त 2008

आयुर्वेदाला उत्तेजन देण्यासाठी

आयुर्वेदाला उत्तेजन देण्यासाठी


आयुर्वेदाला उत्तेजन देण्यासाठी
दै सकाळ दिनांक 28-9-96

स्वातंत्र्यानंतर पन्नास पर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर देशाच्या आरेग्याविषयक धोरणात एक बदल होत आहे, तो म्हणजे आयुर्वेदाला उत्तेजन देणे गरजेचे आहे आणि तसे दिले जाईल हे हळू हळू बोलले जात आहे. अजूनही या बोलण्यामागे पोकळ सहानुभूति व पोकळ आश्र्वासनेच जास्त आहेत, प्रत्यक्ष धोरण किंवा कार्यक्रमाची रूपरेषा फारच कमी आहे असेही जाणवते.

नुकतेच राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणात आयुर्वेदाला (तसेच इतरही वैद्यकिय प्रणालींना) उत्तेजन दिले जाईल असे सांगितले वेगवेगळी सरकांर येत राहिली तरी हे धोरण चालूच राहील असे बोलले जाते. हे धोरणही अगदीच नवीन आहे अस नाही गेली दहा पंधरा वर्ष केंद्रातले व राज्यातले आरोग्य खात्यातील वेगवेगळे मंत्री व अधिकारी आयुर्वेद प्रणालीला उत्तेजन दिले जाईल असे बोलून दाखवत आलेले आहेत (आयुर्वेदा बरोबरच इतरही प्रणालींचा थोडाफार विचार होतच असतो-अशा सर्व समावेशक अर्थाने आयुर्वेद प्रणाली हा किंवा भारतीय प्रणाली (ISM) हा शब्द वापरला जातो.)

या साठी नेमका ऍक्शन प्लान अपुरा पडतो अशी कित्येकांची भावना आहे. सरकारी धोरणातील मोठी विसंगति अशी आहे कि आयुर्वेदाचे ज्ञान लोकांपर्यंत पोचवून लोकांना त्याचा जास्तीत जास्त लाभ करून दिला पाहिजे हे उद्दिष्ट शासनाने स्वीकारलेले दिसत नाही. मात्र देशांत ऍलोपॅथी इतकेच म्हणजे जवळ जवळ पांच लाख आयुर्वेदाचे वैद्य असून त्यांची थोडी बहुत सोय लावून देण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे हे उद्ष्टि डोळयासमोर ठेऊन धोरण आखले गेले आहे असच त्याचा अभ्यास केल्यावर वाटत.

आयुर्वेदाला प्रभावीपणे उत्तेजन मिळावे यासाठी जे कित्येक कार्यक्रम सुचवता येतील (व ते सर्वानी सुचवण्याची गरज आहे) त्यापैकी एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे शालेय शिक्षणात या विषयाचा समावेश याबाबत विविध स्तंभलेखनातून तसेच परिसंवादातूनही जास्त सखोल चर्चा झाली पाहिजे. आजचा आठवी ते दहावीचा विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम कशा ब-हेने बदलायला हवा त्याची चर्चा इथे प्रस्तुत आहे. एक उदाहरण पाहू या. आपण खाल्लेले सर्व अन्न पचन संस्थेमुळे पचवले जाते असे चपापचयाच्या धडयांत सांगितले आहे. पण भूक नसतांना खाऊ नये किंवा तडस लागेपर्यंत खाऊ नये, त्याने पचन संस्थेवर विनाकरण ज्यादा काम येऊन पडते व त्यांतून पुढे मोठे आजार उद्भवतात असे सांगितलेले नाही अगदी लठ्ठपणा (ग््रडद्मत्द्यन््र) या आजाराबाबत सांगतांना देखील गरज नसतांना आणि उठसूट खाणे टाळावे हा उल्लेख केलेला नाही. याचे कारण की आहार विहारातील संयम हा रोग टाळण्याचा प्रमुख उपाय म्हणून जसे आयुर्वेदाने मान्य केली आहे तसे तितक्या प्रकर्षाने ऍलोपथी गधे मान्य केलेले नाही. थोड खोलात जाऊन हा मागोवा ध्यायच तर असे म्हणता येईल कि आरोग्याबाबतची आयुर्वेदाची आणि ऍलोपथी संकल्पना वेगवेगळी असल्याने असे घडते चर्चा पुढे केली आहे याची च मात्र आयुर्वेदातली उपयोगी कल्पना सुद्धा ऍलोपथीच्या शास्त्रांत तेवढी उपयोगाची मानली गेली नसेल तर आपल्या धडयांमध्ये अशा कल्पनेच सभावे केला जात नाही असे या उदाहरणा वरून दिसून येते.

या उदाहरणावरून मला असा मुद्दा मांडायचा आहे कि मुळात आठवी ते दहावीच्या वर्गाना शास्त्र विषय शिकवतांना त्यांत आरोग्यशास्त्र असा एक ठळक भाग असावा. आज आपल्याला एकूण पुस्तकातले कोणते कोणते धडे आरोग्यबाबत आहेत ते प्रयत्न पूर्वक शोधून काढावे लागते. अशा आरोग्य शास्त्र नांवाच्या विभागात सर्वप्रथम थोडक्यांत आरोग्याशास्त्राचा इतिहास हा धडा असावा. फिजिक्सच्या विभागांत जर आर्किमिटिस किंवा न्यूटन विषयी त्यांच्या चित्रासह थोडी माहिती दिली जाऊ शकते तर आरेग्यशास्त्रांत त्यांची कांही कामगिरी आहे व ती आजच्या काळात पण उपयोगी आहे हेच आपण मान्य करत नाही. आरेग्याशास्त्राचे धडे लिहितांना त्यांची आठवण ठेवावी किंवा त्यांनी कांय सिद्धान्त सांगितले होते त्यांची दखल ध्यावी याचे भान कां ठेवले जात नाही? कारण आपल्या शिक्षण प्रणालीत आयुर्वेद किंवा त्यातले चरक, सुश्रृतादि शास्त्रज्ञ हे आजच्या जीवनातले आवश्यक विष्ज्ञय मानले जात नसून त्यांची गणना पुरातत्व शास्त्राच्या विषयांत केलेली असते.

मुळात शाळेच्या अभ्यासात आरोग्यशास्त्राच्या इतिहासाचा धडा समाविष्ट करून आरोग्य रक्षणासाठी वेगवेगळया प्रणाली आहेत व त्या वेगवेगळया तत्वांतर आधारित आहेत हे मुलांना शालेय काळापासूनच शिकवायला हवे. अर्थशास्त्र शिकवतांना जर आपण कम्युनिझम आणि कॅपिटॅलिझम या दोघांचे सिद्धान्त व तत्वज्ञान शिकवतो किंवा राज्यशास्त्र शिकवतांना जर आपण लोकशाही बरोबर राजेशाही, लष्करशाही इत्यादी बाबींचीही दखल घेतो तर आरोग्याशास्त्राचा अभ्यास करतांना ऍलोपथी पेक्षा वेगळया तत्वावर आधारलेल्या आयुर्वेद किंवा होमिओपथी किंवा निसर्गोपचार या प्रणालींबाबत आपण सर्वथा मौन कां बाळगतो? याचे कारण असे वाटते कि शिक्षण शास्त्रात आपण एक असा अलिखित नियम स्वीकारलेला आहे कि जे ब्रिटिश किंवा अमेरिकनांनी चांगले किंवा स्टॅण्डर्ड म्हटले असेल तेच शिकवायचे. आयुर्वेद
म्हणजे अंधश्रद्धा हा ब्रिटिशांनी मारलेला शिक्का आपण अजूनही पुसून काढलेला नाही म्हणूनच आयुर्वेदाला उत्तेजन द्यायचे असेल तर त्याची सुरवात आरोग्य खात्याकडून होऊन उपयोग नसून ती सुरूवात शिक्षण खात्याकडून झाली पाहिजे.

अशी सूचना शिक्षण खात्याने मान्य केलीच, तर आठवी ते दहावीच्या आरोग्याशास्त्राच्या अभ्यासाच्या वेळीच मुलांना असे स्पष्ट केले पाहिजे की आरोग्य रक्षणासाठी तीन पद्धती अस्तित्वांत असून प्रत्येकाच्या तात्विक चिंतनात थोडफार फरक आहेत. या प्रणाली आयुर्वेद, ऍलोपथी आणि होमियोपथी अशा होत.
यापैकी आयुर्वेदात आरोग्य रक्षणाचे तीन प्रकार सांगितले आहेत त्यामध्ये यम, नियम व संयम पाळून रोगच न होऊ देणे म्हणजेच शरीराची प्रतिकार शक्ति वाढवणे यावर मोठा भर दिलेला आहे. दुसरा प्रकार आहे झालेल्या आजाराला दाबून टाकू शकणा-या तीव्र औषधांचा वापर उदा पडसे झाल्यास कपाळावर संठीचा लेप लावणे तिसरा प्रकार आहे रोगाला दाबून न टाकता रोग शरीरातून निघून जाण्यासाठी शरीराला मदत करणे व यार-सी मल मूत्र, घाम व उच्छूवास या चार मल-विसर्जन प्रक्रियांना जास्त कार्यक्षम करणे. उदाहरणार्थ सर्दी झाल्यास उपवास करून म्हणजे पाचनसंस्थेला विश्रांती देऊन, सर्दी बरी होते. याला शमन चिकित्सा असे म्हणता येईल. याच प्रमाणे तीव्र औषधे देऊन रोग दाबून टाकण्याच्या पद्धतीला दमन चिकित्सा म्हणता येईल. आयुर्वेदात तीव्र औषधे दमन चिकित्सेत तर सौम्य औषधे शमन चिकित्सेत मोडतात, कारण त्याचा उपयोग शरीरातील मल विसर्जन क्रिया कार्यक्षम करण्यासाठी केला जातो. उदा. तुळशीची पाने खाऊन घाम येऊन ताप जातो. मात्र कोणतीही वनस्पती थोडया फार अंशाने दमन आणि शमन दोन्ही करत असते.

ऍलोपथीचा इतिहास म्हटल तर फार जुना आणि म्हटल तर दोनशे वर्षाचाच आहे. मुळात ऍलोपथी हा शब्द आयुर्वेदापेक्षा कांही तरी वेगळ या अर्थाने तयार झालेला नसून होमियापथी या शब्दाबरोबर ऍलोपथी हा शब्द निर्माण झाला. आयुर्वेद भारतात वाढला तशा त्यातल्या ब-याच संकल्पना इतरत्र पण पसरल्या, विशेषतः दमन चिकित्सा या चिकित्सेत शरीराला झालेल्या आजारात जी लक्षणे दिसू लागतात त्याच्या विरूद्ध कार्य करणारे तीव्र औषध दिले जाते. अर्थात वनस्पतींपासून असले तीव्र औषध बनवण्याची पद्धत देश कालानुरूप बदलत गेली. मात्र पुढे ऍलोपथी शास्त्राला आधुनिक भौतिकी, रसायन इत्यादि  शास्त्रांची जोड मिळाल्याने त्यांत कित्येक नवीन पद्धती वापरात येउ लागल्या.

या पेक्षा नितांत वेगळी उपचाराची संकल्पना हानमन नांवाच्या एका जर्मन एम.डी डॉक्टरला सुचली व ती त्याने आधी स्वतःवर प्रयोग करून सिद्ध करून घेतली. ज्या वनस्पतीमुळे मूळ रोगा सारखीच लक्षणे निर्माण होतात त्याच वनस्पतीपासून अर्क तयार करून अत्यंत सूक्ष्म प्रमाणात दयायचा हा तो सिद्धांत म्हणून या नव्या पद्धतीचे नांव होमियोपथी म्हणजेच लक्षणा सारखीच चिकित्सा आणि लक्षणा विरूद्धचे औषध देणारी जुनी पद्धत म्हणजे ऍलोपथी असे त्याने नामकरण केले.

मात्र दोन निरोगी व्यक्तिाना एकाच वनस्पतीचे सूक्ष्म औषध दिले तर ज्यांच्यामधे घडून येणा-या लक्षणांची तीव्रता सारखी नसते तसेच त्यांच्यावर घडून येणारे परिणाम त्यांच्या मानसिकतेवर अवलंबून असतात असेंही दिसून आल्याने त्याचाही प्रदीर्घ अभ्यास झाला. आता होमियोपथी मध्ये दिसून येणा-या लक्षणांच्या जोडीनेच प्रत्येक व्यक्तिची मानसिक जडणघडण, त्याचा पूर्वइतिहास, एखाघा घटनेला सामोरे जाण्याची त्याची पद्धत याचाही पूर्ण अभ्यास करून मगच औषध देतात.

ऍलोपथीचे जे आधुनिक रूप आज आपल्याला दिसते त्याचे जुने रूप म्हणजे आपल्याला माहित असलेली आयुर्वेदासारखी दमन चिकित्सा मात्र. गेल्या दोनशे वर्षात लावलेल्या महत्वाच्या शोधांमुळे ऍलोपथीचे रूप पार पालटून गेले. यापैकी सर्वात महत्वाचा शोध म्हणजे शरीरात रक्त नेमके कशा प्रकारे वहाते हा शोध. यातूनच काही ठराबिक अटी वापरल्या तर माणसांचे रक्त एकमेकाना दिले जाऊ शकते व असंख्य जीव वाचवले जाऊ शकतात या प्रक्रियेचा शोध लागला.

दुसरा महत्वाचा शोध म्हणजे ऍण्टीसेप्टिकची कल्पना. माणसाला कोणतीही जखम झाली असेल तर त्या जखमेची जागा निर्जन्तुक न ठेवल्यास किंवा त्या जखमेला निजर्न्तुक नसलेले हत्यार अगर बॅण्डेज वापरले तर मोठया प्रमाणावर सेप्सिस माणूस मरण पावतो ही बाब   सेमिनवेलिसने प्रयोगातून सिद्ध केली. तो काम करीत असलेल्या सरकारी दवाखान्यात प्रसूतीसाठी येणा-या स्त्रियांच्या बाबतीत निर्जन्तुकीकरण करण्याची खबरदारी घेऊन त्याच्या वार्डातील मृत्यूचे प्रमाण खूप कमी करून दाखवले. त्यानंतर ही कल्पना सर्वत्र मान्य केली गेली.

तिसरा महत्वाचा शोध म्हणजे ऍनॅस्थेशियाचा. आपल्या बोटात कांटा गेला असेल तर सुईने तो काटा काढतांना आपण दुखत म्हणून ओरडतो. कारण सुई टोचली की त्याची वेदना मेंदूपर्यत पोचते. त्या वेदनेला सामोरे जाण्याचा एक उपाय म्हणजे ओरडणे. ही वेदना मेंदूला एक प्रकारचा झटका (शॉक) देत असते. जर हा झटका खूप तीव्र असेल तर त्याने मेंदूतील पेशींना कायमपणे दुखापत होऊन ही दुखापत एका ठराविक पातळीच्या वर गेली की जास्त पेशी मरू शकतात. व लगेचच तो माणूस मरण पावतो. ऍनॅस्थेशिया दिला म्हणजे शरीर व मेदूच्या दरम्यान संदेशवाहन करणा-या नर्व्हस् थोडया काळासाठी काम थांबवतात त्यामुळे वेदनेची तीव्रता मेंदू पर्यंत पोचू शकत नाही व डॉक्टरला एखादे ऑपरेशन चांगल्या त-हेने पूर्ण करता येते. अर्थात हे विवेचन बेबळ मानानेच आहे. प्रदीर्घ अभ्यास करायचा असल्यास ऍनेस्थेशिया हा एक अत्यंत मोठया व्याप्तीचा विषय आहे.

वरील तीनही शोधांमुळे ऍलोपथीमधे म्हणजेच युरोपीय देशांमध्ये शर्स्त्राक्रयेचे तंत्र खूप प्रगत झाले. या उलट आयुर्वेदातील शस्त्रक्रियेचे तंत्र जे वरील शोधांच्या तुलनेने अप्रगत होते, ते मात्र एव्हाना लोप पावत चालले होते. वरील शोधांचा वापर करून व त्यामध्ये क्रमाक्रमाने आयुर्वेदातली औषधे आणून आयुर्वेदामध्येही शल्यचिकित्सेची बाजू पुनः बळकट करणे शक्य आहे. पण त्यासाठी अजून बराच लांबचा पल्ला गाठावा लागेल. हा एका वेगळया लेखाचा मुद्दा होऊ शकतो.

ऍलोपथीमधील औषधांबाबत देखील तीन महत्वाचे शोध लागले आहेत. एक इम्युनायझेशनचा शोध, दुसरा ऍण्टीवायोटिकचा शोध आणि तिसरा आहे सिंथेटिक औषधे तयार करण्याचा शोध. यापैकी पहिल्या दोन सिद्धान्ता मधे अशी संकल्पना उदयाला आली कि आपल्याला निरनिराळे रोग होतात ते वातावरणातील जिवाणूंच्या अग्रमाणामुळैच यापैकी इम्युनायझेशनचा सिद्धांत असे सांगतो की एखाद्या रोगाजन्तू अत्यंत प्रमाणांत शरीरांत घुसवले, थोडक्यात त्या रोगाची लस टोचली तर शरीरांत तो रोग निर्माण व्हायला सुरूवात होत असतानाच त्या रोगाच्या प्रतिकाराचे तंत्रपण शीरी आपोआप शिकून घेते. पुढे मागे शरीरावर त्या जंतूचे मोठया प्रमाणावर आक्रमण झाल्यास त्यांचा प्रतिकार कसा करायचा ते शरीराला आधीपासूनच ठाऊक असते, त्याप्रमाणे शरीर प्रतिकार करते व त्या रोगाची झळ पोचू शकत नाही. हा शोध लुई पाश्चर यांनी लावला. ऍण्टीबायोटिकची पद्धत अशी असते की ही औषधे घेतल्यानंतर त्यांच्या रेंजप्रमाणे आपल्या शरीरावर आक्रमण करणा-या कांही विशिष्ट जंतूचा फडशा पाडून रोग बरा करतात. पण त्या बरोबरच आपल्या शरीरांतील कांही पेशींचा पण की औषधे खात्मा करतात याने शरीराचे थोडे नुकसान होत असले तरी रोगकारक जंतूचा मात्र बिमोड होऊन आजार बरा होतो.

सिंथेटिक औषाधांचा शोध म्हणजे रसायनशास्त्राची व औषध निर्मिती शास्त्राची एक गोड जुगलबंदीच म्हणा ना ! पण त्याच्याही पाठीमागे एक महत्वाची संकल्पना आहे. पूर्वपार काळापासून ज्या बनस्पती औषधांवर लागू होत होत्या, त्यांच्या मध्ये प्रत्येकी एखाद विशिष्ट कारक घटक असतो व त्याच्यामुळेच रोगाचा प्रतीकार होतो अशी संकल्पना मांडण्यात आली. रासायनिक विघटन प्रयोगांचा वापर करून असा कारक घटक बाहेर काढता येतो व फक्त त्या घटकाचा वापर करून जास्त तीव्र म्हणून जास्त गुणकारी औषध बनवला येते. त्या वनस्पतीतील इतर रसायने औषधी दृष्टया टाकाऊ असतात, असे ऍलोपथीत मानले जाते. एकदा त्या त्या वनस्पतीतील अशा घटकाचा शोध लागला की पुढे तो घटक वनस्पतीतून तयार करण्याऐवजी कृत्रिम प्रक्रियेतून देखील तयार करता येतो, अशा त-हेने फार्मसी हे नवे शास्त्र अस्तित्वात आले.

मात्र या सर्व प्रगती नंतर आज ऍलोपथी मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कि जिवाणूंमुळे होणा-या आजारावर औषधे सापडली असली तरी शरीरात जेंव्हा घटनात्मक बिघाड होतो त्यावर तो सुधारणारे औषध नसते. रक्तदाब, डायबेटिस, दमा, या रोगांवर औषधे नाहीत. तरी सुद्धा त्या रोगांची वाईट प्रतिक्रिया थांबवू शकणारी औषधे देता येतात. उदा. शारीरातील इन्सुलिन बनायचे थांबले तर शरीराची ती गेलेली क्षमता ऍलोपथीमध्ये पुनः मिळवून देता येत नाही. मात्र बाहेरून इन्सुलिनचे इंजेक्शन देता येते.
या शिवाय युरोपियन देशांमधून थर्मामीटर, क्ष किरणे, लेसर किरणे इत्यादी फिजिक्स मधल्या नव नवीन शोधांचा वैद्यकिय शास्त्रांत तत्काळ उपयोग करून घेतला गेला. आयुर्वेदामध्ये मात्र तो करायचा की नाही आणि करू द्यायचा की नाही हे दोन्हीं प्रश्न अजून अनुत्तरित आहेत.

इम्युनायझेशन आणि होमियोपथतील समचिकित्सेचा सिद्धान्त यांत थोडे साम्य वाटत असूनही बराच फरक आहे. तसेच आयुर्वेदातील प्रतिकार शक्ति जोपासून शरीर बळकट करण्याची कल्पना व इम्युनायझेशनची कल्पना यांत तर कांहीच साम्य नाही.

लूई पाश्चरच्याच इस्ट्टियूट मधील त्याच्या बीचॅम्प नांवाच्या सहकारी डॉक्टरने मात्र बाहेरील जिवाणु रोगाचे कारण असतात या संकल्पनेला विरोध करून शरीरात रोग सुरू झाल्यावर बाहेरील जिवाणू शरीरात येऊन रोगामुळे निर्माण झालेल्या विषारी घटकांचा नाश करतात इत्यादी कल्पना मांडल्या होत्या व बरेच प्रयोग केले होते. आता कॅन्सर, स्ट्रेस, किंवा एडस बाबत रिसर्च करणारे पुनः एकदा बीचॅम्पचा अभ्यास करू लागले आहेत. पण हे आपल्या अलोपथीच्या विद्यार्थ्याना माहीतही नसते.

वरील संपूर्ण विवेचनातून असे लक्षांत येईल की ऍलोपथीची प्रगति म्हणजे आयुर्वेदातील दमन चिकित्सा पद्धतीची अत्यंत प्रगत अशी अवस्था. मात्र आयुर्वेदातील संयमित आहार विहाराच्या सहाय्याने रोग दूर ठेवण्याची पद्धत, किंवा शमन चिकित्सा पद्धत यांचा अभ्यास ऍलोपथीने केलेला नाही. तसेच मनोविकारांच्या बाबतही आयुर्वेद, ऍलोपथी आणि होमियोपथी मधील मत प्रवाह खूप प्रगत पण बरेचसे भिन्न आहेत. पण आपल्याकडे मानसशास्त्र आणि मानसोपचार शास्त्र म्हणून जे काही शिकविले जाते त्यात आयुर्वेद आणि होमियोपथी मधील सिद्धांताचा अजिबात विचार केला जात नाही.

वरील विवेचनाच्या जोडीला बाराक्षार, निसर्गोपचार आणि योगाभ्यास याही पद्धतींची दखल ध्यायला हरकत नाही. बाराक्षाराची औषधे होमियोपथी सरखीच बाटत असली तरी ती मुळात शमन चिकित्सेला जवळची आहेत. निसर्गोपचार म्हणजे दमन चिकित्सेला पूर्णपणे बाजूला ठेऊन फक्त संयम आणि शमन पद्धतीनेच कित्सा करण्याचे तंत्र! आयुर्वेद आणि निसर्गोपचारामधे वनस्पतीशास्त्राच्या जोडीला योगासने, ध्यान इत्यादि पण महत्वाचे उपाय मानले व वापरले जातात. योगाभ्यास म्हणजे पूर्ण पणे संयमन चिकित्सा.

खरे आरोग्य शिक्षण म्हणजे संयम, शमन, दमन व प्रसंगी शस्त्रक्रिया या सर्वाच मदतीने आरोग्य सांभाळण्याचे शिक्षण! मात्र विभिन्न चिकित्सा पद्धतीतले हे फरक शाळेच्या किंवा कॉलेजच्या कोणत्याही धडयांत शिकवले जात नाहीत. त्यामुळे ऍलोपथीच्या विद्यार्थ्याला वरील पैकी एखाद्यासिद्धान्ताचा चांगला वापर करून घेता येत नाही. ऍलोपथीच्या बाहेर कांही चिकित्साशास्त्र असत हेच त्याला खूप उशीरा कळत! कधी कधी तर शेवटपर्यंत कळतही नाही.

मग अमेरीकेतला एक कार्डियाक सर्जन हृदय रोगासाठी योगासने आणि शाकाहाराबाबत प्रयोग करतो. अत्यंत यशस्वी होतो. त्यातूनच खो-याने पैसा कमवतो. भारतात येऊन शोध निबंध वाचतो. आपले केंद्रीय आरोग्य सचिव ते भाषण ऐकतात. आपले कार्टियाक सर्जन असे प्रयोग कां करू शकत नाहीत अस विचारतात (ही चर्चा झाली तेंव्हा मी तिथेच होते) पण आपल्या ऍलोपथीतून पुढे येणा-या डॉक्टरांच्या कानांवर आयुर्वेद हा शब्दच पडू नये याची आपणच खबरदारी घेतलेली असते हे ते सपेशल विसरतात.
आपण जर आदवी ते बारावीची विज्ञान शाखेची पुस्तक वाचली तर अपल्या लक्षंत येईल की ऍलोपथी हा शब्द न वापरता ऍलोपथी मधल्या खूपा संकल्पना त्यांत ब्रह्मवाक्य म्हणून मांडलेल्या आहेत. मात्र आयुर्वेद, होमियोपथी किंवा निसर्गोपचारातल्या कित्येक उपयोगी सिद्धान्तांकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे बारावी पर्यत डॉक्टर होण्याची स्वप्न पहाणा-या विद्यार्थ्याला अचानकपणे कमी कर्म मिळून एम.बी.बी.एस, ला प्रवेश मिळाला नाही तर तो अतिशय मोठे वैषम्य, निराशा आणि दुराग्रहण मनाशी बाळगूनच आयुर्वेदाकडे वळतो. याने आयुर्वेदाला उत्तेजन कसे मिळणार?

तसेच भौतिकी, रसायन आणि वनस्पती शास्त्रातील कित्येक शोध ऍलोपथीमध्ये वापरून ते शास्त्र प्रगत झाले आहे. (उदा. इंजेक्शनची सिरिंज) तसाच या शोधांचा उपयोग आयुर्वेदामध्येही करायला हवा तरच आयुर्वेदाची पुढे प्रगति होईल हे ही विद्यार्थ्याना सांगायला हवे. तशी दिशा न दाखवता आयुर्वेदाची प्रगती किंवा उत्तेजन कसं होणार?

आयुर्वेदात प्रकृति (कफ-पित्त-वात) , आहारशास्त्र, पथ्य, कुपथ्य, नाडी, अग्नि, मनोव्यापार, अशा कित्येक संकल्पना आहेत ज्यांचा रोग प्रतिबंधासाठी व अरोग्य वाढण्यासाठी विशेष उपयोग करून घेता येतो. एक उदाहरण घेऊ या तांदूळ, पोहे, मुरमुरे आणि साळीच्या लाहया हे तांदुळाचेच चार पदार्थ. ऍलोपथी शास्त्राप्रमाणे या सर्वात प्रमुख घटक म्हणजे कार्बोहाइट्रेट. म्हणून इतर कुठल्याही कार्बोहाइड्रेट प्रमाणेच या सर्वाचा शरीरावर परिणाम होणार असेच ऍलोपथीचे पुस्तक सांगेल. आयुर्वेदाप्रमाणे मात्र तांदुळाचा भात हा शरीराला जाड करतो, पोहे जरा कमी प्रमाणात, जाडी वाढवतात. मुरमुरे समसमा आहेत, तर साळीच्या लाहयांनी जाडी कमी होते. याचाच अर्थ असा कि या चार पदार्थाना एका ग्रुप मधे ढकलता येणार नाही, पण आपल्या पाठयपुस्तकात आपण नेमक तेच करतो. असा अभ्यास करून पुढे ऍलोपथीकडे वळणा-या मुलांच्या डोळयांवर एक प्रकारचे झापड बांधलेले असते तर आयुर्वेदाकडे वळणा-या मुलांसाठी असली प्रत्येक संकल्पना त्यांच्या पूर्वी केलेल्या अभ्यासाला धक्का देणारी व गोंधळात टाकणारी असते.

आयुर्वेदातील संकल्पनांची दखल शालेय पाठपुस्तकात न घेण्यामागे आणखीन एक विरोधाभास उठून दिसतो. कफ-पित्त, वात या संकल्पना अशासाठी नाकारयच्या कारण ऍलोपथीने त्या नाकारल्या आहेत. म्हणून शालेय पुस्कांच्या सर्दी पडसे या धडयात कफ प्रकृतीच्या माणसांना पटकन सर्दी होते हा उल्लेख चूकूनही सापडणार नाही. बाहेरच्या व्हायरसांगुळे सर्दी होते असेच कारण लिहिलेले असेल. बारावी पर्यन्त एखाद्या मुलाने कफ-प्रकृतीबाबत चर्चा सुरू केली तर त्याला अंधश्रद्धा व अज्ञान असे म्हटले जाईल. या विद्यार्थ्याला पुढे आयुर्वेदाकडे पाठवले तर तो कफ या संकल्पनेला डोक्यावर घेणार आणि तोच ऍलोपथीकडे वळला तर जन्मभर या संकल्पनेचा धिक्कार करणार! दोघे डॉक्टर! दोघांच्या डिग्रिला प्रसंगी एकाच युनिव्हर्सिटीची मान्यता पण असणार! आरोग्य शास्त्राचे असे कप्पे पाडल्यामुळे आणि त्यातील आयुर्वेदाला शालेय पुस्तकाबाहेर ठेवल्यामुळे खरे नुकसान होते ते लोकांचे आणि रोग्यांचे.

म्हणूनच आयुर्वेदाला उत्तेजन द्यायचे ठरवले असेल तर ते लोकांसाठी आहे की आयुर्वेदाच्या डॉक्टरांची सोय सोय लावून देण्यासाठी याचे स्पष्ट उत्तर दिले गेले पाहिजे. सरकारने लोकांसाठी आयुर्वेद, किंवा लोकांसाठी आरोग्य-शास्त्र हा उद्देश्य डोळयासमोर ठेवावा, वैद्यासाठी आयुर्वेद आणि डॉक्टरांसाठी ऍलोपथी असा उद्देश ठेऊ नये.

यासाठी आरोग्य विभागाआधी शिक्षण विभागापासून सुरूवात करावी. आपल्या शिक्षण व्यवस्थेमधे पन्नास टक्के विद्यार्थी पहिल्या चार इयत्तात व सत्तर ऐंशी टक्के विद्यार्थी दहावीनंतर गळतात हे ध्यानांत घेऊन शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमामधेच आयुर्वेदाची व इतरही प्रणालींची ओळख करून द्यावी.

......................................................
 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें