रविवार, 17 अगस्त 2008

निरोगी शरीर

निरोगी शरीर

---------1---------- 
आपले हात, पाय,
डोळे, कान, नाक,
छाती, पीट, पाठ,
डोकं,
असे सगळे अवयव मिळून आपल शरीर बनतं
आपली सगळी काम शरीर करतं.
पण तेच आजारी झालं तर काम कोण करणार?
शरीर निरोगी रहाव यासाठी काय बरं करावं?

----------------------------------------------------------
 --------------2--------------------
साफ सफाई

शरीर निरोगी रहाव यासाठी साफसफाई हवी.
शरीराची साफ सफाई हवी.
घराची साफ सफाई हवी.
धराबाहेर अंगणाची साफसफाई हवी.
गांवाची पण सफाई हवी.
आपण जिथे पाणी भरतो आणि जे
पाणी पितो तिथे पण सफाई हवी.
तलाव, विहिरी, पंप, कुठेही गाळ
नसावा, घाण नसावी, डबकी नसावीत.
-------------3 --------------------
       भेसळ
आपण भाजीपाला खातो.
डाळ-तांदूळ, गहू, जवारी, बाजरी,
नाचणी, वरई, खातो.
तेल-तूप, दूध खातो. गूळ-साखर खातो.
हे साफ असते कां?
यांत भेसळ नसते नां?
हे पहायला हवं. भेसळ कशी
ओळखायची ते शिकायला हवं.
-----------------------4--------------------
                          शरीर-सफाई
    सकाळी उठून सफाई ला सुरवात करावी. शौच करावे, दांत घासावे, डोळे धुवावे, स्नान करावे. नखं, केस, कापून लहान ठेवावे. फार मोठे ठेऊ नयेत. कपडे नेहमी धुवावे. सावण नसला तरी चालतो पण कपडे धुवायला हवेत तसेच, गादी, चादर, उशी, कांबळं मधून मधून हवा-उजेडांत आणून टाकावी तर ती साफ रहातात.
३.  गुरांचा गोठा, उकिरडे गटारे साफ ठेवावीत. घाण साचत असेल ती उचलून टाकावी. पाणी साचत असेल तर शोष-रवड्डा करावा किंवा मोठी झाडं लावावी. यासाठी शेवगा फार चांगला.
 ------------------------5 ------------------
 आजार
    बहुतेक सगळे आजार पोटामुळे होतात. कुणाला पोटाला पुरेसं खायला मिळत नाही. ताकत हळू हळू कमी होते. याचंच नांव कुपोषण. कुपोषण आल की मग कोणतातरी आजार येतो. हे बाहेरून येणारे आजार जंतूमुळे होतात. जंतू शरीरांत शिरून माणसाला आजारी करतात. पण माणसाला आधी पुरेसं खायला मिळालेल नसत हेच खरं कारण. ताकत संपली कि जंतू वरचढ होतात आणी आजारपण आणतात. लहान मुलांना कुपोषण लवकर होते. विशेष करून आदिवासी भागात. मग मुलं आजारी पडतात. त्यांना उलटी, हगवण, गलेरिया असे आजार होतात. कुणाचे पोट फुगून मोठे होते. खूप ताप येतो. अशा वेळी सरकारी दवाखाना बंद असेल, तिथे डाकटर नसेल, औषध नसेल तर कांय करायचे?
-------------6 ----------------
 कुपोषण
   आई गरोदर असतांना, बाळ पोटांत असतांना नर्स बाई येते आणी औषध देते. ते विटामिन औषध असतं. दुसर एक लोखंडाच औषध असतें. यामुळे बाळाचे डोळे चांगले रहातात आणी कुपोषण होत नाही. औषध मिळाल नाही तर आईने रोज तांब्याची कळशी भरून ठेवावी दिवसभर तेच पाणी प्यावं. बाळ झाल की त्याला लगेच आपल दूध पाजाव. बाळ थोड मोठ झाल की मधून मधून एक छोटा चमचा खोबरेल तेल पाजाव. अशाने कुपोषण होत नाही.
   मुलाला उलटी होल असेल, किंवा जास्त ताप येत असेल तर सारख घोट-घोट पाणी पाजत रहावे. याने आजार थांबतो. तुळशीचे पान आणी साखर खाऊन पण आजार थांबतो. पोटावर ओली माती थापून. थांबतो. डाकटर नसेल आणी औषध नसेल तर एवढे आपण करू शकतो. डाकटर असेल तर साफ सफाई कशी ठेवायची ते विचारून शिकायला पाहिजे. गांवात फवारणी होते कां? कधी होणार हे डाकटरला विचारावे. औषधाचे नांव विचारावे. औषधावर तारीख लिहिलेली असते. ती विचारावी. आजारपण कां येते, कसे येते ते विचारावे. सगळे शिकलो तर आजारपण कमी होईल. ताप लवकर बरा होईल. गांव आनंदी राहील.
....................................................................
 -----------7 --------------- अजून लिहायचे आहे


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें