टाइपिंग रीना सबब दुरुस्त्या करणे आहे
अनुभवातला निसर्गोपचार
निसर्गोपचार हा एकविसाव्या शतकातील काळाची गरज ठरणार आहे आणि पर्यावरणाच्या प्रश्नाशी हा निगडीत रहाणार आहे.
अगदी ढोबळ मानाने निसर्गोपचार म्हणजे काय याचे उत्तर असे की एखाद्या रोगावर औषध न घेता निसर्गात उपलब्ध असलेले पाणी, माती, सूर्यप्रकाश हे घटक वापरून व आहारात योग्य प्रकारे बदल करून केलेली चिकित्सा, पण निसर्गापचारचे खरे मर्म असे आहे की, आधी रोग्याच्या विचारसरणीत योग्य तो बदल होणे गरजेवे असते.
याबाबत माझे दोन अनुभव सांगण्यासारखे आहेत. एका सुट्टीत माझ्या बहिणीची मुलगी वय १२ व भावाची मुगली वय ५ आमच्याकडे रहायला आल्या. मोठया भाचीला कांहीतरी ऍलर्जी होती. मधूनच पित्ताच्या गाठी यायच्या त्यावेळी डॉक्टर असलेली तिची आई कसलेसे इंजेक्शन देत असे. पण ही सोय माझ्या घरी कुठून असायला? एक दिवस तिला पित्ताच्या गाठी आल्याच, हातावर, पाठीवर, आणि तोंडावर. तिने रडून आत्ताच्या आत्ता ते इंजेक्शन शोधून मला दे अस धोशा लावला. तेंव्हा मी तिला समजावल आणि सध्या तात्पुरता माझा उपाय कर, तो ,पर्यन्त मी कोणीतरी डॉक्टर बघते, पण त्याला अर्धा तास लागेल अस सांगितल. तिला झोपवल आणि सगळ्या गाठींवर पाण्याने ओले केलेले रुमाल ठेवले. दर ५ मिनिटाला रूमाल बदलून पुनः पाण्यांत पिळून घ्यायला सांगितले. इकडे तिच्या नेहमीच्या इंजेक्शनची माहिती पण घेतली. मात्र पंधरा मिनिटात तिचा त्रास खूपच कमी झाला होता. मग इंजेक्शन घ्यावेच लागले नाही. यानंतर एकदा छोटया भाचीला पण तशाच गाठी उठल्या. तेंव्हा मी तिला चक्क ओल्या चादरीत गुंडाळून वर ब्लँकेट पांघरूण घालून झोपायला लावले. नुकताच आधीचा प्रयोग पाहिलेला असल्याने ती तयार झाली आणि बरी पण झाली.
पुढे माझ्या मोठया भाचीला तिच्या घरी दोन वेळा हाच त्रास झाला तेंव्हा तिने इंजेक्शन न घेता थंड पाण्याच्या घड्या हाच उपाय केला आणि आता गेल्या चार वर्षात तिला हा त्रास झालेला नाही.
या प्रयोगांत दोन तीन महत्वाचे मुद्दे होते. झालेल्या गाठी पित्ताच्याच असून इतर काही घडल्यामुळे नाहीत हे मला ओळखता येत होते. त्यावरचा पाण्याचा हा प्रयोग अनुभवातला नव्हता पण माहीत होता. मात्र थंड पाण्याने इतर बरेचदा गुणकारी प्रत्यय दिले होते ते माझ्या अनुभावतले होते. त्या दोघी मुलींना माझ्याबद्दल बराच विश्वास होता. धाकटया भाचीच्या तर डोळयांसमोर मोठीला गुण आला होता म्हणून ती पण माझा उपचार करून घ्यायला लगेच कबूल झाली. आता माझ्या बहिणीनेही निसर्गोपचाराची बैठक समजावून घेतलेली आहे आणि मुळात डॉक्टरच असल्याने
माझ्यापेक्षाही खूप चांगल्या तऱ्हेने ती या ज्ञानाचा वापर तिच्या व्यवसायात करून घेऊ शकते.
पुढे माझ्या मोठया भाचीला तिच्या घरी दोन वेळा हाच त्रास झाला तेंव्हा तिने इंजेक्शन न घेता थंड पाण्याच्या घड्या हाच उपाय केला आणि आता गेल्या चार वर्षात तिला हा त्रास झालेला नाही.
या प्रयोगांत दोन तीन महत्वाचे मुद्दे होते. झालेल्या गाठी पित्ताच्याच असून इतर काही घडल्यामुळे नाहीत हे मला ओळखता येत होते. त्यावरचा पाण्याचा हा प्रयोग अनुभवातला नव्हता पण माहीत होता. मात्र थंड पाण्याने इतर बरेचदा गुणकारी प्रत्यय दिले होते ते माझ्या अनुभावतले होते. त्या दोघी मुलींना माझ्याबद्दल बराच विश्वास होता. धाकटया भाचीच्या तर डोळयांसमोर मोठीला गुण आला होता म्हणून ती पण माझा उपचार करून घ्यायला लगेच कबूल झाली. आता माझ्या बहिणीनेही निसर्गोपचाराची बैठक समजावून घेतलेली आहे आणि मुळात डॉक्टरच असल्याने
माझ्यापेक्षाही खूप चांगल्या तऱ्हेने ती या ज्ञानाचा वापर तिच्या व्यवसायात करून घेऊ शकते.
दुसरे उदाहरण मी राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान पुणे या निसर्गोपचार संस्थेत डायरेक्टर असतानाचे आहे. आम्ही पुण्यातील सुमारे २५ ते ३० मधुमेहाचे रोगी घेऊन त्यांच्यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला. दर बुधवारी २ तास असा १२ आठवडयाचा एक कोर्स ठेवला. यामधे मुख्य कार्यक्रम रोग्यांची आपापसात चर्चा व अनुभवांची देवाण घेवाण हा असायचा. शिवाय कांही तज्ञ मंडळींची लेक्चर्स असायची. काय करा, काय टाळा ही चर्चा असायची. आणि प्रत्येकाने आपण घेत असलेला इन्सुलिनचा डोस अगदी हळू हळू गतीने पण निश्चितपणे कसा कमी करता येईल ते पहावे हे उद्दिष्ट होते. डोस कधी कसा किती कमी करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे होते. कांही इमर्जन्सी आलीच तर रात्री बेरात्री पण जे धाऊन येऊन मदत करतील अशा चार डॉक्टरांची यादी तयार ठेवली होती. पहिल्या कोर्समधे त्यांपैकी फक्त एकाला एका रात्री फोन करून सल्ला विचारा लागला यापेक्षा वाईट कांही झाल नाही. यावरून सर्व रोगी किती सावकाशीने व संयमाने प्रयोग करीत होते ते कळते. पहिल्या तीन आठवडयाच झपाटयाने बदल व सुधारणा दिसू लागल्या होत्या व तीन महिन्यानंतर हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाल्याचे त्या रोग्यांनी सांगितले. या काळात आम्ही डायेबेटिस या रोगाचा सर्व बाजूंनी उहापोह केला. मेडिसिन कांय कांय देतात, कॉम्लीकेशन मुळे काय सर्जिकल प्राब्लेम्स येतात, आयुर्वेदातील पथ्यापथ्य, योगासनांची प्रॅक्टीस करून घेणे, चालण्याचा व्यायाम कसा करावा, त्यांत लौकर उठून व मौन ठेऊन चालण्याची गरज, उपवास कसा करावा व कसा टाळावा, फलाहार, शाकभाज्यांचा आहार, थंड पाण्याचे व मातीचे विविध उपचार, मनोवृत्ती, विपश्यना, ऍक्युप्रेशर,
मांसाहार पूर्णपूणे वर्ज्य करण्याची गरज, त्या मागील विचारसरणी इ. खूप मुद्द्यांची चर्चा झाली. आहारात देखील मधुमेह कण्ट्रोल करणारे खूप घटक असतात उदा मेथी, साळीच्या लाहया, ताक इत्यादि. त्याचबरोबर घरबसल्या ब्लड किंवा युरिन शुगर टेस्टिंगची बाजारात आलेली नवी उपकरणे, त्यांच्या किंमती हे पण चर्चेत आले.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या व लाभ झालेल्या मंडळींची एक प्रतिक्रिया खूप महत्वाची होती. ते म्हणाले - आता आम्हाला कळत की आमचा मधूमेह आणि ब्लड प्रेशर दोन्हीं काबूत कस ठेवायच. एखादे वेळी आम्ही वागण्यात, खाण्यापिण्यात अतिरेक केला, तुम्ही सांगितलेली आहार पथ्य नाही पाळली व रोग बळावला तरी घाबरून जाण्याऐवजी नेमक काय करून आम्ही रोग पुनः काबूत आणू शकतो हे कळल.
या रोग्यांना मी एक प्रश्न हमखास विचारीत असे. गोळया खाऊनही तुमचा रोग काबूत रहातो व हे सगळे आहार विहारांतील संयम पाळूनही तुम्ही तो काबूत ठेऊ शकता. मग पहिला मार्गच जास्त सोपा, सुटसुटीत नाही कां? प्रत्येकाने नाही असच उत्तर दिल. त्याची कारणे अशी.
१. गोळ्या खाल्ल्या तरी थकवा, निरुत्साह, सुस्ती, निगेटिव्ह ऍटिटयूड टू लाइफ जात नाही.
२. आहार, विहार व विचारतील फरक व संयमामुळे रोग काबूत ठेवतांना आपण या रोगापेक्षा श्रेष्ठ आहोत, जेते आहोत ही आत्मविश्वासाची भावना वाढते.
३. किती संयम व किती औषध यांचा ताळमेळ कसा बसवायचा ते गणित स्वतःच्या अनुभवातून स्वतःचे स्वतःसाठी बसवून घेतले आहे. हे गणित प्रत्येकासाठी वेगळे असणार व प्रत्येकाने ते स्वतःसाठी सिद्ध करून घ्यावे लागते. इतर रोग्यांपेक्षा आमचा फायदा असा की आमचा तो अनुभव सिद्ध झालेला आहे.
भाग २ निसर्गोपचार आणि आयुर्वेद
४ निसर्गोपचारातील जे उपाय आम्ही मधुमेह कमी करण्यासाठी वापरले त्याने इतर बऱ्याच किरकोळ
तक्रारी संपल्या वगैरे, वगैरे. तर सांगायचा मुख्य मुद्दा हा की निसर्गोपचारांचा विचार करतांना पहिली आपली विचारसरणीच बदलावी लागेल. डोळे उघडे ठेवा, मन उघडे ठेवा, नवा विचार समजाजून ध्या, प्रयोगाला
घाबरू नका, सुरवातीला थोडा धोका पत्करून कां होईना पण प्रयोग करून बघा. करा, केल्याने होत आहेरेआधी केलेची पाहिजे. निसर्गोपचार समजून घेण्यासाठी पहिली अट म्हणजे करून घेण्याची तयारी!
तक्रारी संपल्या वगैरे, वगैरे. तर सांगायचा मुख्य मुद्दा हा की निसर्गोपचारांचा विचार करतांना पहिली आपली विचारसरणीच बदलावी लागेल. डोळे उघडे ठेवा, मन उघडे ठेवा, नवा विचार समजाजून ध्या, प्रयोगाला
घाबरू नका, सुरवातीला थोडा धोका पत्करून कां होईना पण प्रयोग करून बघा. करा, केल्याने होत आहेरेआधी केलेची पाहिजे. निसर्गोपचार समजून घेण्यासाठी पहिली अट म्हणजे करून घेण्याची तयारी!
भाग २
निसर्गापचार ही जर उपचाराची एक पद्धत आहे तर याचा आयुर्वेदाशी कांय संबंध आहे? किंबहुना उपचारांच्या इतर सर्व पद्धतींशी याचा काय संबंध किंवा त्यांचा आपापसांत कांय संबंध? असे प्रश्न सहाजिकय आहेत.
उपचाराच्या प्रचलित पद्धती आहेत आयुर्वेद, ऍलोपथी, होमियोपथी निसर्गापचार, बाराक्षार पद्धती, योग, चुम्बक चिकित्सा, ऍक्युपंक्चर, ऍक्यूप्रेशर इ.
यापैकी आयुर्वदाचे नांद मी सर्जात आधी घेते कारण आयुर्वद सोडून इतर सर्व उपचारांच्या पद्धती
आहेत म्हणजे तुम्ही आजारी पडल्यानंतर घडणा या गोष्टींबाबत आहेत. आयुर्वेद हे मात्र आयुष्यमान वाढवण्याय, निरोगी रहाण्याय, आरोग्य टिकवून तीन भाग आपण करू शकतो रोग न होऊ देणे, शरीराचा कणखरपणा व बल वाढवणे याबाबत सांगितलेले सर्व उपाय स्वस्थव्रत्त या विभागांत मोडतात. रोग झाल्यानंतर करायचे उपाय चिकित्सा या विभागात मोडतील. रोग झाल्या नंतर करायचे उपाय चिकित्सा या विभागात मोडतील. पण त्यातही मला दोन भेद दिसतात. रोग झाला तर त्याला दूर करण्यासाठी शरीर स्वतःच काही उपाययोजना करीत असते. या उपयांना बळकटी देणारा व औषधांचा अगदी सौम्य वापर करणारा, पण पथ्यवर जास्त भर देणारा चिकित्सा प्रकार त्याला बेबळ मानाने आपण शमन पद्धती म्हणू या मात्र रोगावर तीव्रतेने प्रभाव करून प्रसंगी शरीराला इतर बाबतीत थोडा त्रास देऊन रोग घालवण्यासाठी जी औषध योजना केली जाईल तिला दमन चिकित्सा पद्धती म्हणायला हरकत नाही.
मी आयुर्वेदाचे असे तीन भाग पाडते कारण त्यामुळे मला इतर चिकित्सा पद्धतींची विचार सरणी पटकन फळते. ऍलोपथी पूर्णपणे दमन चिकित्सा आहे. तर निसर्गोपचार हे स्वस्थवृत्त आणि शमन चिकित्सा
पद्धती वापरणारं शास्त्र आहे. योग हे पूर्णपणे स्वास्थवृत्त वापरणार शास्त्र आहे तर इतर सर्व पद्धतीत आयुर्वेदाच्या शमन या विचार सरणी सारखाच विचार मांडलेला आहे. इथे मला हे नसूद करण भाग आहे की आरोग्य किंवा चिकित्सापद्धतीचे प्रदीर्घ व सुविस्तृत सैद्धान्तिक विवेचन फक्त आयुर्वेद व ऍलोपथी मधेव झालेले आहे. इतर चिकित्सा पद्धतीमधे ते थेडक्यातच मांडलेले आहे. त्यांची एकमेकांशी तुलना फारशी कोणी केलेली नाही. इतकव नही तर आयुर्वेदातही चिकित्सेमधे शमन आणि दमन हे दोन भाग जुन्या गंथकारांनी पाडलेले नाहीत. पण मी तसे पाडते. ते तसे पाडले जाऊ शकतात कारण इतर कित्येक पद्धतींची विचारसरणी आणि आयुर्वेदातून शमनासाठी वापरलेल्या निरनिराळया उपाया मागची जी वैचारिक बैठक दिली आहे त्यांचे खूप साम्य आहे त्यामुळे आयुर्वेदात उपायांमागची जी वैचारिक बैठक दिली आहे त्यांचे खूप साम्य आहे त्यामुळे आयुर्वेदात उपायांमागची जी वैचारिक बैठक दिली आहे त्यांचे खूप साम्य आहे त्यामुळे आयुर्वेदात विस्ताराने केलेले विवेचन ज्याने समजून घेतले असेल त्याला इतर पद्धतींचा कार्यकारणभाव पटकन समजून येईल.
हा कार्यकारणभाव असा की आपल्या शरीराला नको असलेल्या गोष्टींचे म्हणजेच मूत्र, घाम आणि उच्छवास या चार आपला कचरा या चार मार्गांनी बाहेर टाकला जातो. यापैंकी उत्सर्जनाची एखादी पद्धत नीट काम करेनाशी झाली की काही तरी रोग होतात म्हणून सर्व प्रथम या पद्धती कशा तंदुरूस्त रहातील अरणि आपले काम चोख करतील ते बघा. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की राग म्हणजे काय? तर आपल्या उत्सर्जनाच्या नेहमींव्या पद्धतीत गडबड झाली असेल तर शरीर कांही इतर पद्धतीने कचरा उत्सर्जन करण्याचा प्रयत्न करीत असते. प्रत्येकाच्या शरीरप्रकृति प्रमोणे त्यांचा क्रम पण ठरलेला असतो ताप येणे म्हणजेच त्वचेतून उत्सर्जन सुरू होणे ही पहिली पायरी पुढव्या पाय या म्हणजे वेगवेगळे त्वयारोग व श्र्वासाचे रोग. असे हे विवेचन बरेच पुढे नेता येईल. थोडक्यात शरीराचा खरा रोग म्हणजे कुठे तरी साठलेला कचरा पण दृश्य रोग म्हणजे शरीराने जी पद्धत अमलात आणली तो. म्हणून हे दृश्य रोग पटकन बरे करायचे असतील तर दुसरा उपाय हा की शरीराने कचरा घालवण्यासाठी जो रोग निर्माण केला तीच पद्धत जास्त प्रभावीपण वापरा हा सिद्धान्त होमियापथी मधे प्रकर्षाने वापरला जातो.
या विवेचनावरून अस म्हणता येईल की आरोग्याचे मूळ सूत्र म्हणजे कांय? तर अवांछित कचरा साठू देऊ नका, ज्यासाठी स्वास्थ्यवृत्तात हे करा आणि हे करू नका असे बरेच कांही नियम सांगितलेआहेता. तरी कचरा साठवला तर तो बाहेर काढण्याव्या नेहमीव्या चार पद्धतीं अधिक कार्यक्षम करा, किंवा शरीराने जी इतर पद्धत वापरली असेल ती तरी जास्त प्रभावी करा. इथे हे लक्षात ठेवले पाहिजे की, ऑलोपथीतील इन्युनायझेशन किंवा बॅक्टीरियालॉजी मधील विवेचन या पेक्षा थोड वेगळ आहे.
भाग ३
निसर्गापचार म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी ही सर्व पर्श्र्वभूमि माहीत असली पाहिजे अस मला वाटत, त्याच बरोबर आणखीन एक मुद्दा स्पष्ट करायला हवा.
निसर्गोपचार असा शब्द आयुर्वेदात पण आजव्या इतकी प्रगत नव्हती ऍलोपथीला मेडिसिनल सायन्स म्हणत असत. त्याकाळात सर्मनीत ऍलोपथीतील औषधांना वैतागलेल्या ब-याच लोकांनी या शिवाय कांही उपाय आहे का या प्रश्नातून सुरूवात केली. त्यांनी जे उपाय शोधले त्यात सर्वात प्रसिद्ध झाले लुई कुन्हे यांचे जलचिकित्सेचे प्रयोग शिवाय इलेक्ट्रोपथी चुंबक चिकित्सा, माती चिकित्सा, सूर्यस्नान चिकित्सा याही गोष्टी प्रचलित झाला मांसाहार हा ठराविक रोगांनाच वर्ज्य सांगितला आलेल्यांनी शाकाहाहारची मोहीम सुरू केली. शाकाहाराची फार मोठी परंपरा भारतातही आहे व जगातील जास्तीत जास्त टक्केवारी भारतात आहे. पण त्याचा अगम नेमका कुठे ते सापडत नाही. आयुर्वेदात मांसाहार हा ठराविक रोगांनाच वर्ज्य सांगितला आहे. काळातले चार दाखले मला माहित आहेत.
एकदा प्रथ्वीवर खूप दुष्काळ पडला असता प्रजेने पार्वतीची आळपण केल्यावर तिने प्रसन्न होऊन असे सांगितले की तुळी मांसाहार सोडावा त्या ऐवजी मी तुमव्यासाठी भरपूर शाकभाज्यांची निर्मिती करते ती तुम्ही
खापी. हाय शाकंभरी देवीचा अवतार. तिथून पुढे शेतीला व शाकभाज्यांव्या उत्पादनाला सुरूवात झाली, असे दिवी भागवत सांगते. दुसरा दाखला आहे पातंजली योगसूत्रांचा त्यामधे योगाभ्यासाव्या सुरूवातीला जे पाच यम पाळायला सांगितले म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य आणि असंग्रह त्यांत अहिंसा सर्वप्रथम आहे. त्यामुळे परमयोगी म्हटलेल्या कृष्णाच्या भक्तितून सुरू झालेला वैष्णव संप्रादाय हा शाकाहारी तसेच गणपति हा गजवदन असल्याने शाकाहारी तर दत्तात्रेय हाही शाकाहारी अशा प्रकारे विविध धार्मिक संप्रादयातून शाकाहारची परंपरा आली भगवान महावीर व भगवान बुद्ध यांनी पण अहिंसा व करूणेचा महिमा गात यज्ञातून चालेली बळीची प्रथा बंद केली यापैकी जैनांनी पूर्णपणे तर बुद्ध धर्मियांनी पण मोठया प्रमाणावर मांसाहार वर्ज्य केला. खास पर्यावरण रक्षणासाठी निदान हरीण, मोर या सारख्या प्राण्यांच्या रक्षणासाठी पिढयान् मांसाहार न करण्यासाठी प्रतिज्ञा घेतलेल्या बिशनोई सारख्या कांही पोटजाती राजस्थान हरियाण प्रातांत आढळतात.
एकूण कांय तर शाकाहाराची परंपरा निर्माण होण्यामधे धर्म, पर्यावरण व आरोग्य शास्त्र या तीनही विचारांनी हातभार लावलेला आहे. इथे थोडे विषयांतर करून सांगायला हरकत नाही की लिओ टॉलस्टाय यांनी मानवधर्माचा एक आवश्क सिद्धांत म्हणून म्हणजेच पुनः करूणा या मुघातून शाकाहाराचा विचार रशियात मोठया प्रमाणावर मांडला. निसर्गोपचारामधे तर शाकाहाराचा विचार रशियात मोठया प्रमाणावर मांडला. निसर्गापचारामधे तर शाकाहार हा मस्ट मानला गेला आहे. त्यासाठी डार्विनव्या उत्क्रांतीवादाचा दाखला आहे जर माणसाचे पर्वत माकड हे शाकाहारी आहे तर प्रकृतिने माणसाला सुद्धा शाकाहारी केले असावे. शिवाय शरीरशास्त्राचा दाखला आहे आपले संपूण अन्न मार्गाची म्हणजे तोंडा जास्त त्रासाया मोजली व तिची रचना पाहिली तर ती शाकाहारच्या पचनाला उपयुक्त आहे पण मांसाहाराच्या पचनाला उपयुक्त नाही यावरूनही माणसाने शाकाहारी असले पाहिजे. मांसाहार केल्यास शरीराला अन्न म्हणून कमी उपयोगाचा पण कचरा म्हणून टाकण्यासाठी शरीराला जास्त परिश्रम ध्यावे लागतात, इत्यादि असो.
सुमारे दीडशे वर्षापूर्वी सर्मनीतव्याव जुस्ट या माणसाचे रिटर्न टू नेयर हे ही पुस्तक खूप गाजले त्यातूनच पुढे नेचरोपथी हा शब्द उदयाला आला. त्यांत त्यांनी पाणी, माती, अन्न, निसर्गात मुक्त संचार व आहारातील संयम या उपयांवर भर दिला व कृत्रिम अन्नाचा वापर तसेच औषधांचा वापर का व कसा टाळता येईल त्या बाबतचे मत मांडले. म्हणून आज असे म्हणता येईल की जर्मनीमधला निसर्गापचार म्हणजे पाणी, माती, सूर्य व आहार नियमन या अपायांनी केलेला उपचार.
जर्मनीतील हे उपचार अमेरिकेत गेले तेंव्हा दोन गट पडले. एका गटाने संपूर्णपणे आहार नियमनापरज भर दिला ते स्वतःची शैली हीच प्यूटर नॅचरोपथी असे मानतात. या उलट कांहीनी आहार, माती, पाणी, ऊन, चुम्बक, इलेक्ट्रो, ऍक्यूप्रेशर, ऍक्युपंक्चर, फेथहीलींग, रेकी वगैरे सर्व बाबींचा त्यात
समावेश केला मात्र आयुर्वेद व होमियोपथी सोडून आयुर्वेद त्यांना माहीत नव्हते म्हणून तर होमियोपथीमधे औषध देतात म्हणून.
जर्मन पुस्तकातील हे आधुनिक विचार भारतात आले, ते लक्ष्मण शर्मा, महात्मा गांधी इत्यादींच्या प्रयत्नातून भारतात आल्याबरोबर या विचारांना आयुर्वेदातील कित्येक विचार व परंपरा जोडता येणे शक्य आहे हे ब-याच जणांना कळून आल, तसा दोन्ही शास्त्रांचा सांगड घालून वापरही होऊ लागला. अशी सांगड घातलेल एक अप्रतिम म्हणजे.
मात्र दुदैवाने अजून एक गोष्ट घडली ही परदेशातून आलेली नेचरोपथी शिकून प्रॅक्टीस करू पहाणा या लोकांकडे वैद्यकशास्त्राची डिग्री नसल्याने आयुर्वेद व ऍलोपथी दोन्हीतील डॉक्टर त्यांना तुच्छ व हेय मानू लागले. पैकी ऍलोपथी डॉक्टरांनी भदाखदिलेली तुच्दता कोणी फारशी मनावर घेतली नाही कारण त्या प्रवृत्तीशी लढा भारता बाहेत जर्मनी, इंग्लंड, अमेरिका मध्येही वालला आहेय. पण ऍलोपथीत तुच्द मानल्या गेलेल्या वैद्यांनीही आपल्याला तुच्छ मानाव याच मोठ वैषम्य वाटू लागल. त्यामुळे आम्ही जे उपचार करतो ते आयुर्वेदापेक्षा किती वेगळ आहे हे सिद्ध करण्यातच या निसर्गोपचाराची शक्ती पाया जाऊ लागली. तिकडे आयुर्वेदा बाबत बोलायच झाल तर त्यांत सांगितलेल्या पंचकर्म वगैरे पद्धती किंवा शमन चिकित्सेतील इतर
विज्ञान पद्धतशरीपणे किंवा नेमकेपणाने वापरून फक्त त्यातूनच रोग बरा करू शकणारा वेद्य आयुर्वेदात नाही. वैद्य म्हटला की तो दमन चिकित्सेचा वापर हमखास करणारच. एवढेच नाही तर ही दमन चिकित्सा शास्त्रोक्त पत्रतीने न शिकेलेल्या निसर्गोपचारकांना तो तुव्छच मानणार. अशा प्रकारे आयुर्वेद विरूद्ध निसर्गोपचार या वादामुळे दोन्ही पद्धतींचे नुकसान होत आहे.
तसे पाहिले तर आपल्याकडे डॉक्टरी पेशातील प्रत्येक शाखेतीलय ही वृत्ती बळावली आहे की माझे ज्ञान श्रेष्ठ, तुझे तुच्छ, व तुझे चांगले असले तरी मी ते शिकणार नाही, माझ्या रोग्यांसाठी तर वापरणार नाहीच नाही, वापरले तरी तो माझाय आविष्कार अस सांगून वापरेन. या वृत्तीमुळे आपल्याकडील खर तर कोणताच डॉक्टर होत नाही तो चांगल रिसर्च देखील करू शकत नाही. केंद्र शासनाने प्रत्येक शाखेत एक एक रिसर्च इन्स्ट्टियूट निर्माण केली आहे ऍलोपथी, आयुर्वेद, होमियोपथी, निसर्गापचार, यूनानी व योग अशा सहा शाखंगधल्या रिसर्च इन्स्ट्टियूट आहेत. मात्र जयपुर कूट सारखा एका प्रायव्हेट डॉक्टरने केलेला अनोखा आविष्कार पगळता आपल्या देशात एकही मोठा यशदायक आविष्कार घडलेला नाही. याच अर्ध कारण आपल्या डॉक्टरांनी वृत्ती आणि ठरलेल अर्ध कारण आपल्या निरक्षर, अज्ञानी समाजात आहे.
.................................................
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें